5 जून पर्यावरण विश्व दिवसाच्या निमित्ताने डॉ. पठान यांना पृथ्वी रतन अवॉर्ड ने अमृतसर येथे सिने अभीनेत्री जयाप्रदा यांच्या हस्ते सन्मानीत
नांदेड – प्रथमच माझे भाग्य समजतो की अमृतसर येथील पवीत्र भूमी व गुरु गोविंद सिंघजी (गुरु नानक साहिब) यांच्या पावनभुमीत माझे सत्कार झाले ते मी भाग्य समजतो जो मला येथे येण्याचा मान मिळालेला आहे. 5 जून विश्व पर्यावरण दिवसाच्या निमित्त माझे सामाजीक क्षेत्र, पत्रकारीता क्षेत्र, भ्रष्टाचाराची लढाई, कणखर व दमदार दैनिक नांदेड चौफेरची आवृती व एनजीओ या सर्व विषयावर आयएचआरसीसीसी यांनी निरीक्षण करुन मला पृथ्वी रतन अवॉर्ड देण्याचे ठरविले होते. त्यानुसार मी तो अवॉर्ड स्वीकारण्यास अमृतसर येथे पोहचलो होतो.
आयएचआरसीसीचे आमचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. व्ही.पी.सिंग यांनी महाराष्ट्रातून दोनच व्यक्तीची निवड केली होती. त्यात एक कोल्हापूर मधुन व दुसरी व्यक्ती नांदेड मी डॉ. मो. आरेफखान यांची निवड केली होती त्याबद्दल मी व्ही.पी.सिंग यांचे आभारी असुन तेथे मला मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली आणि मला व्यासपीठ उपलब्ध करुन दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो जे आम्हाला संताच्या पावनभूमीत मला योग्य मान सन्मान दिलेले आहेत.
या कार्यक्रमासाठी फिल्म अभीनेत्री जयाप्रदा, शक्ती कपूर ही बॉलीवुड कलाकार प्रमुख अतीथी होते. या दरम्यान शक्ती कपुर यांची प्रकृती ठिक नसल्याने ते येऊ शकलेले नव्हते. मात्र जयाप्रदा ह्या उपस्थित होत्या. या विश्व पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने देशातून समाजकार्य करणारे 60 लोकांना जयाप्रदा यांच्या हस्ते अवॉर्ड, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहेत. मात्र आमची सामाजीक कार्यासोबतच पत्रकारीता क्षेत्र असल्याने व चौथा स्तंभ असलेल्या लिखाणाच्या कार्याची पावती म्हणुन जयाप्रदा यांनी स्वताच्या स्वखर्चाच्या पैशातुन एक लॅपटॉप नांदेड चौफेरला दिलेला आहे. व आयएचआरसीसीसी तर्फे पृथ्वी रतन अर्वार्ड आणि प्रशस्तीप्रमाणपत्र जयाप्रदा व डॉ. व्ही.पी. सिंग यांच्या हस्ते देऊन आमचा भुषणावह असा सत्कार करण्यात आला आहे जो मी आयुष्यभर विसरणार नाही जो माझा अविस्मरणीय क्षण लॅपटॉपचा राहिल. जी अभीनेत्री असून ती खासदार सुध्दा आहेत हा अनमोल असा क्षण होता तो कायमचा आठवणीत राहिल.
त्यानंतर तीर्थक्षेत्र गुरुनानक साहिब (गुरुद्वारा) येथे जयाप्रदार समवेत दर्शन घेऊन प्रथमता मी पावनभुमीत जाण्याचा मान मिळालेला आहे. त्यानंतर दुसर्या दिवशी मिलीटरी कॅम्प, बिएसएफ कॅम्प येथील पाहणी करुन स्वातंत्र्य काळातील, रणगाडे, तोफगोळे, फायटर प्लेन, आरमार शस्त्रे, दारुगोळा व अन्य वापरलेली शस्त्रास्त्रांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर भारत पाकीस्तानचा वाघा अटारी बॉर्डर येथे दोन ते 7 च्या दरम्यान निक्षुन हा सलामीचा कार्यक्रम बघीतला तो मनसुन्न करणारा क्षण असुन देशाप्रती आदर व बलीदानाचा बलीदान व्यर्थ जात नाहीत ते आजही जीवंत असल्याचे सलामीच्या कार्यक्रमातून आठवते. जो देशगीताच्या गाण्यावर भारतातील बीएसएफचे जवान 1 तासाचा कार्यक्रम करुन दाखवीतात जो एकाच वेळी त्याच वेळेत भारत आणि पाकीस्तानाच्या जवानांकडुन मानवंदना दिली जाते. या दरम्यान सलामी देतेवेळेस पाच मिनीटे भारत आणि पाकिस्तानचा मुख्य गेट उघडला जातो आणि बॉर्डर सीक्युरेटी फोर्स एकमेकांना सलामी देऊन हातात हात मिळवणी केल्या जाते तो क्षण अंचबीत करणारा असतो. प्रेक्षक लाखोंच्या संख्येत उपस्थीत असतात.
प्रेक्षकांच्या टाळींच्या गजराने व जवांनाची कृती आणि आहुती पाहुन आमचे मन भारावुन गेलेत खरोखरच भारतीय संरक्षण यंत्रणेचे स्तुती करण्यासाठी शब्दही कमी पडतील जे बीचारे रात्रंदिवस पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाची पर्वा न करता भारत मातेचे संरक्षण करतात. ते ही परीवारापासून दुर राहुन देश सेवा करतात. म्हणुन आम्ही मागणी करतो की सरकारने यांना भरघोस पगार व मुलभुत सुविधा द्याव्यात त्यांना कोणतीही कमतरता भासु नये त्यांच्यामुळेच आम्ही सर्व भारतीय सुखरुप आहोत. परत पुलवामा होऊ नये जे आमचे शेकडो सैनीक मारले गेलेत. ही सरकारचाच अपयश आहे असे तत्कालीन राज्यपाल यांनी अनेक गोष्टींचा व सरकारच्या कथनी व करणीचा उपक्रमच मांडलेला होता. यामुळे सैनीकही सुरक्षीत नाहीत जे सरकारच्या नीती, ध्येय धोरणाचे बळी सैनीक पडु नयेत त्यामुळे त्यांचे खच्चीकरण होत आहेत. आणि त्यांच्यातच भयभीतीच वातावरण निर्मीती होत आहेत.
तसेच जुलै महिन्यात राजस्थान येथे सिने अभीनेत्री शिल्पा शेटी यांची मुलाखत राजस्थानमध्ये ठरली असुन प्रत्येक महिन्यात किमान एक तरी पुरस्कार मला घोषीत होत आहेत. बॉलीवुड कलाकांराचे पाच पुरस्कार मिळाले असुन रजा मुराद, अरबाज खान, हेमामालीनी, जयाप्रदा, शिल्पा शेट्टी सहीत असे 23 पुरस्काराचा मानकरी नांदेड चौफेर ठरलेला आहे.
अल्पावधीत दोन वर्षाच्या काळात 23 पुरस्काराचे नांदेडचे भुमीपुत्र डॉ. मो. आरेफखान पठान हे जिल्ह्यातील व मराठवाड्यातील पहिले व्यक्ती ठरणार यात काहीही शंका नाही आणि लवकरच सलमान खानची भेट ठरली होती मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ती पुढे ढकलल्या गेलेली आहे. ती लवकरच पुढील तारीख निश्चीत केली जाईल.