मराठवाडा
मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे परभणी जिल्ह्यात ‘सत्याग्रह”
परभणी; 27 मार्च 2023_( परभणी जिल्हा प्रतिनिधी ):परभणी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी परभणी जिल्हा काँग्रेसने जिल्ह्यात सकाळी १० वाजल्यापासून सत्याग्रह केला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.आ. सुरेशराव वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरा मध्ये सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ.सुरेशराव वरपुडकर म्हणाले की,राहुलजींच्या प्रश्नांना घाबरून त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आले पण काँग्रेस नेते राहुल गांधींचा आवाज हा देशातील १४० कोटी जनतेचा आवाज आहे. तो काही केल्या दाबता येणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर द्यावेच लागेल.विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर ईडी व सीबीआय सारख्या संस्थांद्वारे कारवाई केली जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. विरोधकांचा आवाज दाबून देशात दडपशाही व हुकूमशाहीची वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मोदी केवळ मन कि बात करताहेत, त्यानी आता प्रयंत एकही पत्रकार परीषद घेतली नाही.
सत्याग्रह आंदोलनाचे प्रास्ताविक माजी महापौर भगवानदादा वाघमारे यांनी केले तसेच माजी आ. सुरेशदादा देशमुख यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला. माजी खा. तुकारामजी रेंगे पाटील, बाळासाहेब देशमुख, दुराणी खानम यांनी निषेध व्यक्त करत संबोधित केले . या आंदोलनात रामभाऊ घाडगे, रविराज देशमुख, तुकाराम वाघ, पंजाबराव देशमुख, मुंजाजी धोंडगे,रवी सोनकांबळे,गुलमिर खान,मल्लिका गफार मॅडम, जानू बि मॅडम, मिन्हाज कादरी, श्रीधर देशमुख,डॉ. संजय लोलगे, दिलावर शेख, सुहास पंडित,अभय देशमुख, दिगंबर खरवडे,सुरेश देसाई, अभय कुंडगिर, श्रीकांत पाटिल, सुनील देशमुख, सचिन अंबिलवादे, विनोद कदम, नागेश सोनपसारे, विशाल बुधवंत, देविदास मुलगिर, मुंजाभाऊ गायकवाड, तुकाराम साठे, अतीक उर रहेमान,अमोल जाधव,
महमूद,अमोल देशमुख, श्रीरंग वाघ, जगन्नाथ रणेर, रामेश्वर खटिंग, प्रल्हाद अवचार, सुरेश काळे,साबळे, अंगद सोगे, राजेश रेंगे, अब्दुल सईद, वैजनाथ देवकते, सुमेध मगरे , अभिषेक नन्नवरे, मेहराज कुरेशी, अमोल देशमुख, पांडुरंग भवर, मयूर देशमुख, सचिन जवंजाळ, विनोद लोहगावर, शेख जम्मू, किशन काळे, उद्धव रामपुरीकर, मधुकर कदम, रुपेश शिंदे, मंचक वाघ, गोपीनाथ देशमुख, चंद्रकांत साळवे, सुधीर कांबळे, अजय चव्हाण,अमोल डाखोर, निखिल धामणगावे, वाहिद भाई, तसेच काँग्रेस चे बहुसंख्य महीला ,पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.