पेंदा येथील ग्रामसेवकावर त्वरित निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा 30 मार्च रोजी आत्मदहनचा इशारा
किनवट प्रतिनिधी
मागील सुमारे 55 वर्षापासून वहिती करत असलेल्या शेतातील उभ्या पिकांमध्ये खड्डे खोदून नुकसान करणाऱ्या व सदर शेतीत बेकायदेशीर रित्या प्लॉटिंग काढण्याच्या उद्देशाने गावातील नागरिकांकडून पैसे घेऊन नमुना क्रमांक 8 ला नोद करणाऱ्या पेंदा येथील ग्रामसेवकावर त्वरित निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा 30मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा पिडित शेतकरी अनिल मुनेश्वर यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे
निवेदनात नमूद केले आहे की किनवट तालुक्यातील मौजे यंदा येथील शेत सर्वे नंबर 101/1 मध्ये मागील सुमारे 55 वर्षापासून गावातील रंगराव मुनेश्वर हे कास्त करत असून त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा मुलगा अनिल रंगराव मुनेश्वर हे नियमितपणे वहिती करून उदरनिर्वाह करत आहेत
सदर शेती ही ओलिताखाली असून सध्या कांदा, लसूण, कोथिंबीर, गहू हरभरा इत्यादी पिके लागवड केलेली आहेत मात्र ही शेत जमीन सरकारी परंपोक असल्याचे सांगत ग्रामसेवक अशोकराव चव्हाण यांनी शेताचे तार कुंपण व गेट काढून त्या ठिकाणी खड्डे खोदले व प्लॉटिंगच्या नावाखाली गावाकर्याकडून 15 ते 20 हजार रु वसुल करून नियमबाह्य रित्या नमुना क्र 8 मध्ये नोंद करत आहेत.
55 वर्षापासून कास्त करत असलेली शेत जमीन नावावर करावी यासाठी पीडित शेतकऱ्याने वन हक्क कायद्यानुसार जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे दावा दाखल केला आहे. व याबाबत दिनांक 8/10/2020 रोजी रोजी मंडळ अधिकारी, तलाठी,पोलीस पाटील व सरपंच यांनी स्थळ पंचनामा करून सादर केला आहे. शेत जमिनीच्या दावा जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे प्रलंबित असतानाही ग्रामसेवक अशोकराव चव्हाण हे शेताचे कुंपण काढून पिकाचे नुकसान करत खड्डे खोदत असून प्लॉटिंगच्या नावाखाली नागरिकाकडून पैसे घेऊन नमुना नं8 वर नोंद करत आहेत त्यामुळे या प्रकरणी त्वरित चौकशी करून ग्रामसेवकावर निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा 30 मार्च 2023 रोजी आत्मदहन करण्याचा ईशारा पीडित शेतकरी अनिल मुनेश्वर यांनी दिला आहे.