रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे धरणे आंदोलन
रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारकांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि दहा कलमी प्रलंबित मागण्यांबाबत रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जंतर-मंतर, नवीदिल्ली येथे गुरूवार, दिनांक 16/03/2023 लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील चार लाख रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारक सहभागी होणार आहेत,या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील 2000 रास्त भाव धान्य दुकानदारांपैकी 1200 रास्त भाव धान्य दुकानदार आज दिनांक 14/03/2023 रोजी सकाळी मराठवाडा संपर्कक्रांती एक्सप्रेसने रवाना झाले.
या लाक्षणिक धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
1)वन नेशन वन रेशन वन कमिशन
अंतर्गत देशातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारक यांना केंद्र शासकीय कर्मचारी घोषित करण्यात यावे किंवा शासकीय कर्मचारी घोषित करण्यात अडचण येत असल्यास दरमहा रूपये 55000/-मानधन देण्यात यावे,यातही अडचण असल्यास,प्रत्येक रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारकास 3000 लोकसंख्या आणि प्रति क्विंटल रूपये 460/- कमिशन मंजूर करण्यात यावे.
2) जानेवारी 2023 पासून थकीत असलेले कमिशन तात्काळ रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारकांचे खाती जमा करण्यात यावे, तसेच यापुढील कमिशन धान्य वितरण करण्यापूर्वीच रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारकांचे खाती जमा करण्यात यावे.
3) रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारकांना अन्न धान्य वितरण करीत असताना प्रति क्विंटल 2 किलो तुट मंजुर करण्यात यावी.
4)ई-पाॅज मशिन्सवर सुरळीत आणि अखंड सर्वर आणि नेटवर्क उपलब्ध करून दिले जावे.
5)कोविड काळात शहीद झालेल्या रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारकांच्या वारसास 50 लाख रूपये अनुदान देण्यात यावे.
6) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत वितरण केलेल्या अन्न धान्यासह इतर सर्व थकीत कमिशन तात्काळ रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारकांचे खाती जमा करण्यात यावे.
7)सर्व प्रकारचे अन्नधान्य जुट बारदान्यात उपलब्ध करून देण्यात यावे.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नांदेड येथुन नांदेड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक जयवंतराव एडके,यांच्या नेतृत्वात अब्दुल सलीम अब्दुल मुनीर, कार्याध्यक्ष, शाहुराज गायकवाड, राज्य सहसचिव, अशोक गायकवाड, उपाध्यक्ष,बळवंत सूर्यवंशी,जिल्हा कोषाध्यक्ष,अनिल पुरूषोत्तम कुलकर्णी, सरचिटणीस, चंपतराव कवळे पाटील, तालुकाध्यक्ष, हदगाव,प्रल्हाद चव्हाण, तालुकाध्यक्ष मुदखेड,उध्दवराव राजेगोरे, तालुकाध्यक्ष, अर्धापूर, विजय उनग्रतवार, तालुकाध्यक्ष देगलुर, संतोष बामणे,तालुकाध्यक्ष बिलोली,मिलींद खंदारे, तालुका सचिव, हदगाव,ज्ञानेश्वर उकरंडे, शहराध्यक्ष, ताहेरखान,शहर उपाध्यक्ष, मो.जमिल, शहर कोषाध्यक्ष, मो.मुजाहेद, मो.कलीम अब्दुल सलीम,मो.फारुख,मो.शारेख,अब्दुल नदीम अब्दुल सलीम,शाहनवाज अन्वर,हंसराज काटकांबळे, सचिनपत्तेवार, प्रणव उमरीकर.सहभागी होत आहेत.
या धरणे आंदोलनात सहभागी होत असलेल्या रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारक यांना निरोप देण्यासाठी, नांदेड जिल्हा काॅग्रेस कमिटीचे उमाकांत पवार,सुभाष काटकांबळे,म.सादीक मरखेलकर
यांच्यासह नांदेड शहरातील रास्त भाव धान्य दुकानदारांची उपस्थिती होती.