मराठवाडा
मुख्य कमानीची रोषणाई करुन भाविकांना दर्गा परिसरात सोयी सुविधा तातडीने द्या – जिल्हाधिकाऱ्यांकडे एमडीओ संघटनेची मागणी
परभणी: परभणी येथील राष्ट्रीय एकात्मतेच प्रताक मानल्या जाणाऱ्या हजरत सय्यद तुराबूल हक रहे. यांचा 116 या उस शरीफ महोत्सवास उद्या बुधवारी 1 फेब्रुवारी पासून सुरवात होणार आहे या निमित्ताने दरगाह शरीफ येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे. यांच्या उर्सा निमीत्त जांब नाका येथील महापालिकेने उभारण्यात आलेल्या भव्य कमानी ची रोषणाई व रंगरंगोटी महापालिकेच्या वतीने उर्साच्या आठवड्यापूर्वी केली जाते असे परंतु यावेळी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर केले नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण यावेळी वक्फ बोर्डाने उर्सात टेंडर प्रक्रियेत कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला दुसरीकडे वक्फ बोर्डाने उर्स निमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन केले मात्र जांब नाका येथील भव्य कमानी ची रोषणाई न केल्यामुळे भाविकांकडून एकच नाराजी व्यक्त केली जात आहे.
रोषणाईची उपयोजना मनपा करणार की वक्फ बोर्ड आजुन गुलदस्त्यात दिसत आहे अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कोरोना संसर्गजन्य परिस्थितून बाहेर पडल्या नंतर हा पहिलाच उर्स आहे त्या मुळेच जनसामान्य लोक या पवार्ची उत्साहाने वाट पहात होते महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांचे भाविक महोत्सवाला उपस्थित असतात परंतु या ठिकाणी वक्फ बोर्डाचे म्हणावे तसे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही उर्स व्यवस्थापन समितीला आपल्या स्तरावरून आदेशीत करून या हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क जाम नाका येथील भव्य कमानी ची रोषणाई तात्काळ करण्यात यावी तसेच बाहेरील येणाऱ्या भाविकांना गरजे नुसार सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर यांनी केली आहे