शेख याहिया यांना राष्ट्रीय रतन पुरस्कार प्रदान
नांदेड- माझा महाराष्ट्र लाईव्हचे संचालक तथा संपादक व सामजिक कार्यकर्ते शेख याहिया यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीयरत्न सन्मान 2023 हा पुरस्कार दि. 26 जानेवारी रोजी मेयर हॉल बीएमडब्ल्यू शोरूम लाईन अंधेरी वेस्ट मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कृष्णा चव्हाण फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव महाजन, संगीतकार इस्माईल दरबार , भाजप नगरसेविका सुनिता राजेश मेहता, गायिका रितू पाठक , डॉ. कृष्णा चव्हाण, पत्रकार नसीर तगले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यात गेल्या 13 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य शेख़ याहिया यांचे असून निस्वार्थपणे ते पत्रकारिता करीत आहेत. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे.
सामाजिक क्षेत्रात गेल्या 13 वर्षांपासून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देत आहेत. या कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना सत्यशोधक मंचचा उत्कृष्ट पत्रकार, राज्यस्तरीय आदर्श पत्रकार, खादीमे उम्मतचा उत्कृष्ट पत्रकार, शक्ती फिल्मचा आंतरराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार तसेच महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्र भूषण व जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तर आता कृष्णा चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट राष्ट्रीय रतन सन्मानाने गौरविण्यात आल्याने याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.