जिला

हिमायतनगर शहरातील ईदगाह मैदान चोरीला गेल्याचा माजी आमदार नागेश पाटील यांचा आरोप..

बिले उचलून घेतलेली वास्तू शोधून द्या अन्यथा दोषिवर कार्यवाही करा

हिमायतनगर प्रतिनिधी/- नगरपंचायत अंतर्गत नगरोत्थान योजना 2016 /17 मध्ये मी आमदार असताना शहरातील मुस्लिम बांधवांना नमाज पठण ईदगाह मैदान बांधकाम करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता त्या निधीचे बांधकाम सुद्धा पूर्ण करण्यात आले होते परंतु पुन्हा दलितोत्तर योजना सन 2018 19 या काळात मैदानाची सुधारणा करणे म्हणून येथील नगर पंचायत ने दलित्तेतर योजने मधून अंदाजे 42 लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला त्या निधीचा हिमायतनगर येथील नगरपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संगणमत करून संबंधित गुत्तेदाराशी हाताशी धरून शासनाची दिशाभूल करत सन 2018/19 मध्ये जुन्याच ठिकाणी लाखो रुपयांचे बांधकाम झाल्याचे दाखवत मोठा गैरव्यवहार केला या कामाची घटना स्थळी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज दि 27 जानेवारी रोजी जाऊन उपस्थित मौलाना व नगरपंचायतीचे कर्मचारी व शहरातील मुस्लिम बांधव यांच्यासमोर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी या घटनेचा जाब विचारला असता अधिकारी कर्मचाऱ्यांकडे याचे उत्तर मिळाले नाही तेव्हा त्यांनी ईदगाह मैदान चोरीला गेल्याचा आरोप नगरपंचायत प्रशासनावर करत ज्या ठिकाणी अंदाजे 42 ते 50 लाख रुपयाचे काम करून बिले उचलून घेतली ती वस्तू शोधून द्या अन्यथा दोषीवर कारवाई करा अशी मागणी माजी आमदार नागेश पाटील यांनी केली अन्यथा ह्या कामाचा पंचनामा करून वरिष्ठांना ह्याचा अहवाल पाठवा अशा भाषेत प्रशासनास सांगितले…

याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील अनेक दिवसापासून गाजत असलेल्या ईदगाह मैदानाच्या बांधकामाचा भ्रष्टाचार आज दिनांक 27 जानेवारी रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सर्व जनतेसमोर उघड केला आहे माजी आमदार नागेश पाटील यांनी आज हिमायतनगर येथील नगरपंचायतला भेट दिली असता येथे उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांनी व गावकऱ्यांनी संबंधित ईदगाह मैदानच्या भ्रष्टाचाराची प्रशासन चौकशी करत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी व्यक्त केला होता त्याच कामी त्यांनी तात्काळ दखल घेऊन नगरपंचायत कार्यालय अंतर्गत नगर उत्थान योजना 2016/17 मध्ये ईदगाह मैदानाचे बांधकाम पूर्ण झालेले असताना सुद्धा सन 2018/19 या काळात पुन्हा दलित्तेतर योजनेमधून अंदाजे 42 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेत ईदगाह मैदानाची सुधारणा करण्याकामी म्हणून नगर पंचायतच्या अधिकारी ,कर्मचारी यांना हाताशी धरून सबंधित गुत्तेदारांने हे षड्यंत्र रचले व शासनाचा लाखो रुपयांचा निधी त्यांनी परसपर उचलून घेतला त्याच कामाची माहिती विचारण्यासाठी आज दिनांक 27 जानेवारी रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील यांनी हिमायतनगर येथील तहसीलचे नायब तहसीलदार तामसकर व नगरपंचायतीचे ओ.एस. महाजन व लिपिक शिंदे यांना घटनास्थळी बोलावून संबंधित योजनेमधून करण्यात आलेले काम दाखवा असे विचारले असता त्या कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की झालेले काम ह्याच ठिकाणी करण्यात आले होते असे सांगितले असता घटनास्थळी उपस्थित असलेल्या ईदगा मैदान येथील मौलाना यांना ह्याची माहिती विचारले की सन 2018 /19 /20 मध्ये इथे बांधकाम करण्यात आले का ? तेव्हा त्या मौलांनानी असे सांगितले की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम किंवा साधे एक प्लेअर सुद्धा बांधण्यात आले नाही त्यामुळे हा सर्व भ्रष्टाचार झाल्याचे सरळ सरळ उघड झाले आहे त्यामुळे ह्या कामाची संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून वरिष्ठांना ह्याचा अहवाल पाठवा व दोषिवर कठोर शिक्षा करा अन्यथा बिले उचलून घेतलेली वास्तु शोधून द्या अशी मागणी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रशासनास केली अन्यथा मी शिवसेना जिल्हा प्रमुख ह्या नात्याने सर्व मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडून तुम्हाला शिवसेना स्टाईलने उत्तर देईल असा इशारा सुद्धा त्यांनी ह्यावेळी बोलतांना दिला…
यावेळी असंख्य हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button