जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
नांदेड,22- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य करण्याचे असे आवाहन केले आहे.
पावसाच्या पाण्याचे संकलन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे. शाळा खोली बांधकाम, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, पशुवैद्यकिय दवाखाने आदी शासकीय इमारतीचे बांधकाम करतांना यापूर्वी रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे ऐच्छिक होते. परंतू आता सर्व शासकीय इमारत बांधकामात रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमची स्थापना केली जाईल. यासाठी बांधकाम विभागाचे अभियंता आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. नांदेड, भोकर व देगलूर बांधकाम उप विभागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, पशु वैद्यकिय दवाखाने, अंगणवाडी व शाळा खोली बांधकाम असे एकूण 209 इमारतीच्या कामांचे अंदाजपत्रक तयार आहेत. या अंदाज पत्रकात रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अंतर्भूत करण्यात आली आहे.
पावसाचे पाणी संकलन करून पर्यावरण संरक्षणासह पाणीटंचाई कमी करणे तसेच भूजल पातळी वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व इमारत बांधकाम करातांना तसेच पंधराव वित्त आयोगातील इमारत बांधकाम व सभागृह बांधकाम इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंक सिस्टीम बसवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.