खुल्या रांगोळी स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नांदेड,13- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने नांदेड शहरात विविध महासांस्कृतिक कार्यक्रम होणार असून यानिमित्त शिवचरित्रावर आधारित खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडच्या आयटीआय प्रांगणात दिनांक 18 फेब्रुवारी रोजी या स्पर्धा होणार आहेत. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
या स्पर्धेतचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही प्रसंगावर स्पर्धक रांगोळी काढू शकतील. नेमून दिलेल्या जागेत रेखीव व सुबक रांगोळी काढावी. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून वय व लिंगभेदाशिवाय या स्पर्धेत भाग घेता येईल. रांगोळी जास्तीत जास्त आकर्षक रेखीव. सुबक काढणे अपेक्षित आहे. ही स्पर्धा दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी आयटीआय प्रांगणात सकाळी दहा ते बारा या वेळेत घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत परीक्षकांच्या वतीने अंतिम निकाल घोषित केला जाणार आहे. स्पर्धेत प्रथम येणा-यास 10 हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पुरस्कार 5 हजार तर तृतीय पुरस्कार 3 हजार रुपये व स्मृतीचिन्ह प्रदान केले जणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थही काही पुरस्कार प्रदान केले जाणार जातील.
स्पर्धेकरिता लागणारे सर्व साहित्य स्पर्धकांनी सोबत आणणे आवश्यक आहे. सदरील रांगोळी स्पर्धेत भाग घेऊ ईच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे स्पर्धेपूर्वी नोंदवणे आवश्यक आहे. नाव नोंदणी करिता जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूलच्या पाठीमागे स्काऊट गाईड कार्यालय वजीराबाद येथे कक्ष स्थापित केला आहे तथे स्पर्धकांनी आपली नावे नोंदवावीत. दिनांक 16 फेब्रुवारी राजी सांयकाळी चार वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी लागणारे प्रपत्र nanded@gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त रांगोळी स्पर्धेकानी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी केले आहे.