महासंस्कृती महोत्सवानिमित्त फोटोग्राफर्ससाठी स्पर्धेचे आयोजन छायाचित्रे पाठवण्याची 14 फेब्रुवारी अंतिम मुदत
नांदेड,12- देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त नांदेड येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध स्पर्धेसह हौशी फोटोग्राफर्ससाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक 14 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असून निवड झालेल्या छायाचित्राचे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी होळी येथील नंदगिरी किल्ला येथे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
ही स्पर्धा नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्रापूर्ती मर्यादित राहणार आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध घटना, ठिकाण, निसर्ग, पर्यटन इत्यादी बाबीवर छायाचित्र असावीत. स्पर्धकांनी प्रत्येक छायाचित्रासोबत दोन ते तीन वाक्यात माहिती मराठी भाषेत युनिकोड फॉर्म मध्ये किंवा हस्तलिखित करून त्याचा स्पष्ट फोटो स्वरूपात करून पाठवावा. एका छायाचित्रकाला स्पर्धेत घोषित विषयासाठी एकूण 10 छायाचित्र सहभागी करता येतील. स्पर्धेत आयोजकांमार्फत मूळ थीमशी जुळणारी त्यांची मूळ डिजिटल छायाचित्रे मागणी केल्यास स्पर्धकास ती सादर करावी लागेल. या स्पर्धेत जानेवारी 2023 ते फोटो स्पर्धा सामील होण्याच्या अंतिम तारखेपर्यंत काढलेले छायाचित्र ग्राह्य धरण्यात येतील. फोटो छायाचित्रासाठी आपल्या अर्जासह पीडीएफ स्वरूपात 2mg मर्यादित clicknanded@gmail.com या मेल आयडीवर सादर केलेली छायाचित्रे स्पर्धेत ग्राह्य धरण्यात येतील. ब्लर झालेली छायाचित्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत.
डीएसएलआर व मोबाईल फोटोग्राफी या दोन्ही फॉर्ममध्ये स्पर्धक भाग घेऊ शकतात. ड्रोनद्वारे काढलेली छायाचित्र स्वीकारली जाणार नाहीत. फोटोचे रिझोल्यूशन जेपीईजी किंवा पीएनजी फाइल्स असणे आवश्यक आहे. फोटोवर कोणत्या प्रकारचा लोगो, वॉटर मार्क, कॉपीराईट मार्क, ओळखीचे चिन्ह अथवा कोणतेही अन्य दृश्य स्वरूपाची बाब टाकता येणार नाही. फोटो त्याच्या मूळ स्थितीत असणे आवश्यक आहे. रंग, कॉन्स्टास्ट, ब्राईटनेस ऍडजस्टमेंट आणि फोटोचे क्रॉप करणे यासह मूलभूत संपादन स्वीकार्य आहे. परंतु असे कोणतेही संपादन फोटोच्या सत्यतेवर किंवा वास्तविकतेवर परिणाम करणार नाही.
विजेता स्पर्धकाकडील छायाचित्रांच्या मूळ फाइल्स आरएडब्ल्यू/ जेपीईजी मागणी केल्यानंतर सादर करणे संबंधित स्पर्धकास बंधनकारक राहील. स्पर्धा सर्व वयोगटातील सर्व फोटोग्राफी प्रेमींसाठी खुली आहे. जिल्हा प्रशासन नांदेड यांना स्पर्धा आणि त्यांच्या थिमशी सादर केलेली छायाचित्रे भविष्यात संबंधित प्रचारात्मक कृतीसाठी वापरण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा अधिकार असेल. त्याबाबत भविष्यात कुठलीही आर्थिक अथवा मानधन स्वरूपाची मागणी स्पर्धकास करता येणार नाही. छायाचित्रकार आणि कलाकारांचे तज्ञ पॅनल सर्जनशीलता, तांत्रिक गुणवत्ता, रचना आणि थीमसह संरेखन यावर आधारित निवड करेल. निवड झालेल्या विजेत्यांना थेट जिल्हा प्रशासनाकडून निवडी बाबत कळविले जाईल. सर्व विषयातून प्रत्येकी एका विजेत्यांना जिल्हा प्रशासनाकडून गौरवण्यात येईल. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. अयोग्य वाटली जाणारी किंवा नमूद केलेल्या स्पर्धेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही प्रवेशास अपात्र ठरवण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे. स्पर्धक वय वर्ष 18 वर्षा खालील असल्यास अर्जावर पालकाची स्वाक्षरी, त्यांचा आधार कार्ड नंबरसह नोंदवणी करणे क्रमप्राप्त आहे. छायाचित्रांचा मुळ हक्क हा छायाचित्र स्पर्धकांचा असून, संबंधित छायाचित्र इतरत्र वापरण्याची मुभा छायाचित्रकारास असेल.
छायाचित्रकारांनी आपले आर्ज दिनांक दिनांक 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवावेत. परीक्षेच्या निकालाबाबत सर्व अधिकार निवड समिती आणि जिल्हा प्रशासनाकडे राखीव राहील. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड- वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.