जिला
नांदेड जिल्हा पोलीस दलाकडुन 03 कोटी 23 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत
26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्तक दिनाचे निमित्ताने पोलीस मुख्यालय, नांदेड येथील कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहन संपन्न झाल्यानंतर किंमती मुद्देमाल सुपुर्द करण्याचा कार्यक्रम नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजीत करण्यात आला होता. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, डॉ. शशीकांत महावरकर, जिल्हाधिकारी, नांदेड, मा. श्री अभिजित राऊत, मा. आ. अमर राजूरकर, पोलीस अधिक्षक, नांदेड, श्री श्रीकृष्ण कोकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, श्रीमती मिनल करनवाल, आयुक्त, नांदेड वाघाळा महानगर पोलीका, नांदेड डॉ महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी, श्री पी. एस. बोरगांवकर, अपर पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार, निवासी उप जिल्हाधिकारी, श्री महेश वडदकर, पोलीस उप अधिक्षक (गृह), डॉ. अश्विनी जगताप, श्रीमती स्नेहल कोकाटे यांचे हस्ते फिर्यादी यांना किंमती मुद्देदेमाल परत करण्यात आला.
नांदेड जिल्हयातील पो. स्टे. अंतर्गत विविध गुन्हयातील आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेला किंमती मुद्देमाल ज्यामध्ये सोन्याचे, चांदीचे व रोख रक्कम असा एकूण 98,58,112/- रु. व इतर मुद्देमाल ज्यामध्ये वाहन, मोटार सायकल, मोठी वाहने व इतर असा एकूण 2,25,19,700/- रु. व सायबर सेल 128 मोबाईल किंमती 21,31,095/- रु.चे मोबाईल फोन असा एकूण 3,23,77,812/- रु.चा मुद्देमाल हस्तगत करुन कायदेशीर बाबींची पूर्तता करुन फिर्यादी यांना परत केला आहे.
सदर मुद्देमाल हस्तांतर करण्यासाठी मा. डॉ. शशीकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, डॉ. खंडेराव धरने, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु), नांदेड श्री जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक, सपोनि. श्री तुगावे, आरेसवार, मिटके, पोउपनि गंगाप्रसाद दळवी, (सायबर सेल), सपोउपनि श्री त्र्यंबक भोस्कर, कदम, पवार, पोह/कागणे, बेरळीकर, मपोह टोम्पे, श्रीमंगले, पोकों/ राठोड व वंजारे आर्थिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी अथक परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्वी केला.