Uncategorized

मोटार सायकल वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरू

 

नांदेड दि. 01 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26- सीएल ही नवीन मालिका 6 डिसेंबर 2023 पासून सुरू होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्विकारण्यात येणार आहे. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेक्स्ट मॅसेज द्वारे संबंधित अर्जदारास कळविण्यात येईल. याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button