राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धेत नांदेडचा सुवर्ण षटकार
ज्ञानेश , सार्थ , पृथ्वीराज ,अजय टिमला सुवर्णपदक , तर ज्ञानेश चेरले व तेजवीर सिंग वैयक्तिक सुवर्णपदकाचे मानकरी सृष्टीला रौप्य व कास्यपदक …… सृष्टी ,ज्ञानेश व तेजवीरची राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेसाठी निवड . नुकतेच महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन अंतर्गत चंद्रपूर जिल्हा आर्चरी असोसिएशनच्या वतीने 20 व्या ज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्वीघा स्पर्धेचे आयोजन दिनांक 11 ते 13 ऑक्टोबर 2023 दरम्यान तालुका क्रीडा संकुल वरोरा येथे करण्यात आले होते . त्यात नांदेडच्या संघाने प्रशिक्षका वृषाली पाटील जोगदंड याच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत अतिशय अटीतटीच्या लढतीत ज्ञानेश चेरले ,सार्थ तमलुरकर , पृथ्वीराज चव्हाण व अजय राठोड यांच्या टीमने अमरावती , पुणे सह महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीच्या संघावर निर्विवाद वर्चस्व गाजवीत सुवर्णपदकाची लूट केली .तर वैयक्तिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत ज्ञानेश चेरलेने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत एक सुवर्ण व दोन कास्यपदक पटकावले तर तेजवीदसिंग जहागीरदार नेही सर्वोत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदकावर आपले नाव कोरले . महिलांमध्ये सृष्टी पाटील जोगदंडणे एक रौप्य व एक कांस्यपदक पटकावले .
यातील ज्ञानेश चेरले ,सृष्टी पाटील जोगदंड व तेजवीरसिंग जहागीरदार यांची जूनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना जिल्हा सचिव तथा राष्ट्रीय प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड ,बालाजी चेरले यांचे मार्गदर्शन लाभले . त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे राष्ट्रीय धनुर्वीधा संघाचे महासचिव प्रमोद चांदुरकर प्रशिक्षक रवी शंकर ,क्रीडा अधिकारी संजय बेतीवार , संतोष कनकावर ,माजी महापौर जयश्रीताई पावडे ,राजश्रीताई पाटील ,तालुका संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास भुसेवार जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश तमलुरकर डॉ . हंसराज वैद्य , उपाध्यक्ष मुन्ना कदम कोंडेकर , शिवाजी पुजरवाड ,डॉ . मनोज रेड्डी अॅड अरुण फाजगे अशोक मोरे , सतीश पाटील जाधव ,मालोजी कांबळे ,विक्रांत खेडकर सहसचिव नारायण गिरगावकर ,बाबुराव खंदारे , गंगा लाल यादव , ज्ञानोबा नागरगोजे ,गजानन फुलारी . डॉ. दिलीप भडके , शिवानंद लिंगायत प्राचार्य डॉ . विजय कुलकर्णी उपप्राचार्य संजय अवधाने , मुख्याध्यापक मनोहर सूर्यवंशी , बाबू भंदपवाड ,प्रेम जाधव , प्रा. हनुमंत कदम , चरण कमलजीत सिंग जागीरदार ,शिवाजी पाटील इंगोले ,राजेंद्र सुगावकर , शिवाजी नरवाडे , शिवाजी केंद्रे ,यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत