जिला
केंद्र सरकार विरोधात, अर्धापूर येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन
अर्धापूर (शेख जुबेर) काँग्रेस नेते राहुल गांधींवर संसदेच्या सचिवालयाने तडकाफडकी सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केल्यानंतर मंगळवार रोजी भाजप हटाव, लोकशाही बचाव च्या घोषणा देत तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून टाकला. यावेळी तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील ग्रामीण व शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विविध घटक, गट, समूहांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर यांच्या सह अनेकांनी आक्रमक भाषणे केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ अर्धापूर येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. व तहसीलदार उज्वला पांगरकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, युवकचे जिल्हाध्यक्ष तिरूपती कोढेकर, शहराधक्ष राजेश्वर शेटे,
नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्ष मुसबीर खतीब, माजी नगराध्यक्ष नासेरखान, संचालक सुभाषराव देशमुख, प्रविण देशमुख,माजी सभापती आनंदराव कपाटे, संजय लोणे,मिर्झा अख्तरउल्ला बेग, गाजी काजी, विशाल लंगडे, भगवानराव तिडके, मारोतराव गव्हाणे,शिवलिंग स्वामी,सरपंच रमेश क्षिरसागर, तालुकाध्यक्ष राजु निकम, अशोक सावंत, बालाजी गव्हाणे, राजु बारसे, युवक काँग्रेसचे स्वप्नील पा.टेकाळे,सरपंच साहेबराव कदम, उपसरपंच लिंगोजी चिंतले,अबुझर बेग,राजू कल्याणकर,उपसरपंच यशवंत शिंदे, बालाजी कदम, बाळु पा धुमाळ, राजाराम पवार,राजु गायकवाड,शंकरराव ढगे, राजेश लोणे, नामदेव सरोदे, सय्यद मोहसीन, सोनाजी सरोदे, संजय गोवंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.