जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस मुद्देमालासह अटक
माली गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक 03/07/2024 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, रेणुकाई हॉस्पीटल जवळ, जबरी चोरी करणारे आरोपीपैकी एकआरोपी गोवर्धनघाट, नांदेड येथे आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने गोवर्धनघाट, नांदेड येथे सापळा रचुन आरोपी नामे शेख माजीद शेख उस्मान वय 20 वर्ष व्यवसाय बेकार रा. गोवर्धनघाट, नांदेड यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने व त्याचा इतर एक साथीदार यांनी मिळुन दिनांक 07/06/2024 रोजी रेणुकाई हॉस्पीटल जवळ, नांदेड येथुन एका महीलेच्या गळयातुन जबरीने गंठन चोरी केले होते असे सांगीतले.
नमुद आरोपीचे ताब्यातुन गंठनचा त्याचे हिश्याचा तुकडा व मंगळसुत्र किंमती 44,895/- रुपयेचा जप्त करण्यात आला असुन त्याचा इतर एक साथीदार यांचा शोध घेणे चालु आहे. मिळुन आलेल्या आरोपीस मुद्येमालासह पोलीस ठाणे गु.र.नं. 84/2024 कलम 392 भा द वि गुन्हयाचे पुढील तपासकामी शिवाजीनगर पोलीसांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / मिलींद सोनकांबळे, पोकों/बालाजी यादगीरवाड, विठ्ठल शेळके, ज्वालासिंघ बावरी, गजानन बयनवाड, विलास कदम, चालक हनुमानसिंह ठाकुर स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे