राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा समृद्धी मार्ग – प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार
नांदेड,1- महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षण घेत नियमित अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी समाजकार्यात अग्रेसर राहिले पाहिजे. समाजातील जे जे दुर्बल घटक आहेत त्यांना मदत करणे व आपले स्वतःचे कुटुंबाचे व समाजाच्या शेवटपर्यंत घटकातील व्यक्तीच्या आपण कामी आलं पाहिजे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरे विद्यार्थ्यांच्या जीवनात सर्वांगीण उन्नतीचा समृद्धी मार्ग ठरतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले. श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 29 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला सुरुवात झाली. शिबिराच्या उदघाटन समारंभात अध्यक्ष पदावरून प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार बोलत होते. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी समन्वयक प्रा. डॉ. नागेश कांबळे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले.
उदघाटकीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. नागेश कांबळे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही एक विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देणारी विद्यापीठाची महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. भविष्यात एक चांगला वक्ता, चांगला गायक, उत्तम सामाजिक कार्यकर्ता निर्माण होण्याची संधी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्राप्त होते. त्यामुळे आठवडाभर चालणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्येक उपक्रमात हीरिरीने सहभागी होऊन आपले कला कौशल्य सिद्ध केले पाहिजे असेही आवाहन यावेळी डॉ . नागेश कांबळे यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य
डॉ. व्ही. आर. राठोड, यांनी देखील विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविककार्यक्रमाधिकारी डॉ. गणेश लिंगमपल्ले यांनी केले.
यावेळी संत सेना महाराज मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीवास्तव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार डॉ. राजेंद्र कांगणे, कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय मोरे आदीची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संत सेना महाराज व स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. गणेश लिंगमपल्ले यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय मोरे यांनी मानले.यावेळी डॉ. पी.बी.बिरादार, डॉ. जी. वेणूगोपाल, डॉ. जगदिश देशमुख, डॉ. एस.व्ही. शेटे,डॉ. अनिल गच्चे, डॉ. सुनिता गरुड मॅडम, प्रा. प्रतिभा घोडवाडीकर, डॉ. संतोष शिंदे, डॉ. साहेबराव मोरे, डॉ. साहेबराव शिंदे, डॉ. गणेश ईजळकर, डॉ. एल व्ही खरात, प्रा. समाधान दराडे, डॉ. राहुल सरोदे, प्रा. करण हंबर्डे, प्रा. कपिल हिंगोले, प्रा. करण राठोड, प्रा. माधव हाळे, प्रा.नागेश भूमरे, प्रा. शशीकांत हाटकर यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.