जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना बाबुराव पुजरवाड यांच्या उपस्थितीत अभिनंदन पत्र दिले
नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून प्रशासन गतिमान व पारदर्शक करण्यासाठी पुढाकार घेऊन राज्यात नांदेडची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा नांदेडच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांच्या उपस्थितीत
आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अभिनंदन पत्र दिले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिधल करनवाल ह्या नांदेड जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाल्यापासून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. बायोमेट्रिक प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांची उपस्थिती घेण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त लागली आहे. ई-फाईल प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर शिक्षण व आरोग्य विभागामध्ये सुरू केल्यामुळे राज्य शासनाने देखील या उपक्रमाची दखल घेतली आहे. ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी क्युआर कोड सिस्टीम सुरू केली, त्यामुळे नांदेड पॅटर्न इतर जिल्ह्यात राबवण्यासाठी शासन विचाराधीन आहे. सर्व संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया, आश्वासित योजना लाभ देण्याबाबत प्रश्न निकाली काढले आहेत.
पंचायत विभाग अंतर्गत पीडीआय ऑनलाईन करण्यात नांदेड जिल्हाचा राज्यात प्रथम क्रमांक आहे. केंद्र शासनाच्या पोषण अभियान योजनेत महाराष्ट्रातून 2023 मध्ये जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. नरेगा अंतर्गत गरजू बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत आहे. टाईम बॉण्ड रेफरन्सद्वारे ग्रामीण भागातील अभ्यांगतांच्या अर्जावर पृष्ठांकन करून सदर प्रकरणे निकाली काढण्याबाबत कार्य तत्परता दाखवलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील 52 गावांना अमृत आहार योजनेतून जीपीडीपीच्या आराखड्यातून तरतूद उपलब्ध करून दिले आहे. याची केंद्र शासनाने देखील नोंद घेतली आहे. तसेच बालिका पंचायत हा नावीन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर स्थापित करून मुलींच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय नेतृत्वगुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशा विविध नाविन्यपूर्ण योजना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्ह्यात सुरू केल्याबद्दल नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अभिनंदन पत्र दिले आहे.
अभिनंदन पत्रावर युनियनचे अध्यक्ष धनंजय गुम्मलवार, सचिव राघवेंद्र मदनुकर, कार्याध्यक्ष मुकेश पाटील, कोषाध्यक्ष सचिन चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना देण्यात आले आहे. युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह पवन तलवारे, प्रदीप परांडेकर, विक्रम रेनगुंटवार, संतोष राऊत, नितीन पाम्पटवार, राजू पांगरीकर, गणेश मज्जेवार, बाबासाहेब राठोड, रामेश्वर बेळगे, बालाजी सुरकुटवार, शंकर तूमोढ, किशोर खिल्लारे, जितेंद्र टोटलवाड, गोविंद गंजेवार, शेख मुकरम, शुभम तलेवार, मंगेश ढेंबरे, शिवराज कोल्हे, संभाजी दवने, शेख जाफर, ओंकार पांचाळ, सचिन चौदंते, इंदुमती वाघमारे, छाया कांबळे, राधाबाई सर्जे, सोनाली वाघमारे, गांगवाणी आळंदीकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.