सोनापीरबाबा उर्स निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करा सोना पीर बाबा दर्गाचे मुजावर यांचे सह भाविकांची मागणी
किनवट (प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र माहूर शहरातील सुफी संत बाबा सोनापीर यांच्या दरवर्षी होणाऱ्या उर्स निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी येथील मुजावर बाबर शेख फकीर मोहम्मद आणि भाविक भक्तातून होत आहे शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार माहूर शहरात दरवर्षी मार्च महिन्यात दिनांक ०५ ते १० मार्च पर्यंत पाच दिवस सोनापीर दर्गाहावर विविध धार्मिक सामाजिक हिंदू मुस्लिम ऐक्याचे कार्यक्रम चालतात तसेच येथे लहान मुले वयस्कर तरुण-तरुणीसाठी विविध खेळाचे प्रकार खाण्यापिण्याच्या वस्तू कपडे इतर सर्व साहित्य माफक दरात मिळत असल्याने लाखोच्या संख्येने सर्वधर्मीय भाविक येथे येऊन सलग पाच दिवस सलोख्याने दर्शनासह आनंद घेतात.
तसेच माहूर शहरातून काढण्यात येत असलेल्या संदल मिरवणुकीत सर्वधर्मीय नागरिक भाग घेतात दिनांक पाच रोजी होणाऱ्या संदलच्या कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशातील सहा ते सात राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या लाखावर असते त्यामुळे दिनांक पाच रोजी बाबा सोनापीर उर्स निमित्य शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी अनेक वर्षापासून होत असून शासनाकडून यावर्षी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सुटी जाहीर करावी अशी मागणी येथील मुजावर बाबर शेख फकीर मोहम्मद तसेच येणाऱ्या भाविकातून होत आहे.