नांदेड डिव्हिजन चे रेल्वे विद्युतीकरण पूर्ण काकीनाडा एक्सप्रेस परळी मार्गे शिर्डीला धावणार….!
नांदेड डिव्हिजनचे रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यावर असून दिनांक एक मार्चपासून काकीनाडा शिर्डी एक्सप्रेस परळी मार्गे परभणी वरून शिर्डीला धावणार आहे. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात असून पहिल्यांदा काकीनाडा शिर्डी एक्सप्रेस रेल्वे विद्युतीकरण ट्रेक वरून धावणार आहे. बऱ्याच वर्षापासून रेल्वे विद्युतीकरणाचे स्वप्न मराठवाडा वासियांचे पूर्ण होत आहे. विहित मुदतीच्या आत हे काम पूर्ण झाले आहे.
दिनांक एक मार्च रोजी एक मार्च रोजी हैदराबाद परळी गंगाखेड परभणी जालना औरंगाबाद मनमाड मार्गाने शिर्डीला जाणार . शिर्डी ला जाण्यासाठी येण्या-जाण्यासाठी बारा एक्सप्रेस गाड्यांची सुविधा रेल्वेने उपलब्ध केलेली आहे. काकीनाडा एक्सप्रेस पहिली गाडी विजयवाडा शिर्डी एक्सप्रेस दुसरी गाडी तिरुपती औरंगाबाद एक्सप्रेस तिसरी गाडी हैदराबाद औरंगाबाद चौथी गाडी तिरुपती शिर्डी पाचवी गाडी शिर्डी सिकंदराबाद सहावी गाडी या सर्व गाड्या नांदेड डिव्हिजन मधून इलेक्ट्रिक वर धावणार आहेत.
अशा प्रकारची माहिती रेल्वेच्या सूत्रधाराने दिली. नांदेड ते मनमाड दुहेरीकरणाचे काम लवकरच होणार आहे. लिमगाव चुडावा पूर्णा तसेच मिरखेल पिंगली पूर्णा विद्युतीकरणाची काम जोरात सुरू आहे . विद्युतीकरणामुळे प्रवाशामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाकडून प्रवाशांना आव्हान करण्यात आले रेल्वे खांब अथवा रेल्वे पटरी जवळ असलेल्या सामानास हात लावू नये. त्यामुळे दुर्घटना होऊ शकते प्रवाशांनी आपल्या जीवित्ताची काळजी घ्यावी. काकीनाडा एक्सप्रेस ला रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे हिरवे झेंडे दाखवणार का? रेल्वेचे अधिकारी खासदार आमदार याप्रसंगी उपस्थित राहून रेल्वेला हिरवी झेंडे दाखवणार का? अशा प्रकारची विचारणा प्रवाशांकडून होत आहे.