मनरेगाच्या हेल्पलाईन संपर्काव्दारे मिळाला रोजगार, सर्वांपर्यंत हेल्पलाईन नंबर पोहचविण्याचे सीईओंचे आवाहन
नांदेड,26- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा स्तरावर सुरू केलेल्या हेल्पलाईन नंबरच्या संपर्काव्दारे रोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.
नरेगा अंतर्गत कामाची मागणी केल्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. जर तिथे दाद मिळत नसेल तर यासाठी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर आत्तापर्यंत जिल्ह्यातील सात व्यक्तींनी संपर्क साधला. त्यापैकी तीन व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. यापैकी एक स्थलांतरित, एक गावातील रहिवासी नाहीत, एका व्यक्तीने मजूरी वाढवून मिळावी तर एकाने अंग मेहनतीचे काम सोडून वाहन चालकाचे काम मागितले होते. यात पात्र असलेल्या तीन व्यक्तींना काम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच त्यांचे नरेगा अंतर्गत मस्टर देखील काढण्यात आले आहेत.
मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, आंदोलकांवरही कारवाई
हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा
नरेगा अंतर्गत रोजगार मागणीसाठी गाव स्तरावर काही अडचणी येत असल्यास जिल्हास्तरावर 9373422680 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून कामासाठी नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, नरेगाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, अभियंता, ग्रामसेवका, ग्राम रोजगारसेवकांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हेल्पलाईन नंबरचा प्रचार करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे. बेरोजगार वंचित राहूनये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हास्तरावर हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. बेरोजगारांनी 9373422680 या हेल्पलाईन नंबरवर सुट्टीचे दिवस वगळून व कार्यालयीन वेळेत फोन करून आपले संपूर्ण नाव, गाव व तालुक्याची माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी केले आहे.