राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय नांदेड येथे कार्यशाळा संपन्न
नांदेड:- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत वयवर्षे ० ५ वर्षे वयोगटातील बालकांना दि. ३ मार्च २०२४ रोजी पोलिओ लस पाजविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांनी नांदेड जिल्ह्य़ातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील ईनचार्च सिस्टर, अधिपरिचारीका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी यांची कार्यशाळा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.
डॉ विद्या झिने मॅडम, निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे सादरीकरण केले. ० ते ५ वर्ष वयोगटातील एक ही बालक पोलिओ लसीकरण पासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी असे डॉ निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. यावेळी डॉ हनमंत पाटील, डॉ अंकुशे, लालसिंग सर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अनिता गायके, शुभदा गोस्वामी, वंदना सोळंके, अपर्णा जाधव, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, ईनचार्च सिस्टर सुचिता नवघडे, गणेश झगडे, गिरीश पाटील, नागनाथ पवार, श्रीमती सब्बनवार, आलसटवार जिल्ह्य़ातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी उपस्थित होते.