ही ‘वंदे भारत’ परभणी-नांदेडकरांसाठी साठी किती फायद्याची?
“ट्रेन क्रमांक 20705/20706 ह्या जालना-मुंबई आज पासून सुरू होणाऱ्या वंदे भारत चे मराठवाड्यात सहर्ष स्वागत करत असतांना व पुढे जालना-नांदेड मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण होताच ही ट्रेन नांदेड पर्यंत धावेल ह्यात शंका नाहीं. पण आजच्या वेळापत्रका प्रमाणे ह्या ट्रेन ची गती व प्रवासचा वेळ पाहता व तिकीटचे वाढीव दर व फक्त चेर कार ट्रेन पाहता, जर पुढे वेग वाढून प्रवासचा वेळ कमी करणारे सोयीचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले नाहीं तर मात्र ह्या ट्रेनचा नांदेडकरांना काही फायदा होईल असं वाटत नाहीं. कारण आज मुंबई-जालना हे ४३७ किमी चे अंतर कापायला जर ही ट्रेन ७:२० तास घेत असेल तर जालना -नांदेड हे १७३ किमीचे अंतर ही ६० किमीप्रती तास वेगाने अजून ३ तास घेईल अर्थात एकूण साधारणत: १० तास म्हणजे जाणं येणं २० तास प्लस स्टॉपेजचे किमान अर्धा ते एक तास जरी गृहीत धरलं तरी उर्वरित २ -३ तासात ह्या ट्रेनचे क्लीनींग व मैनटेइन्स करणं शक्य नाहीं अन् हेच कारण पुढं करुन ही ट्रेन जालनाच्या पुढे नांदेड विस्तारितच होऊ नये, एकाच रॅक ने अप डाउन प्रवास फेरी पूर्ण करावी ही ह्या मागे मंशा असल्याची शक्यता ज्यास्त आहे.
ऐरवी ट्रेन क्रमांक 12071 मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस चे वेळापत्रक अन् वेळ पाहता तसेच सद्य बुकिंग पाहता वंदे भारत ला किती प्रतिसाद मिळेल ह्या बाबतीत ही शंकाच आहे. तेव्हा आता नांदेड व परभणी च्या सन्माननीय लोकप्रतिनिधीनी वेळीच ह्याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य पाठपुरावा करावा व मुंबई-नांदेड प्रवास कमाल ७ ते ८ तासातच पूर्ण होईल अश्या वेळापत्रकाची मागणी आता पासूनच करावी. बहुतेक मार्च पूर्वीच ह्या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण होईल अन् पुढे केव्हाही आचारसंहिता लागेल तेंव्हा आता पासून काळजी घेणं गरजेचे आहे. नसता ह्या ट्रेन चा संपूर्ण मराठवाड्याला फायदा झाला असं मुळीच म्हणता येणार नाहीं.
गाडी क्र. नाव मुंबईहून सुटते नांदेड येते. एकूण तास
17617. Tapovan 05:30. 18:00. 12:30
11401. Nandigrm 16:35. 05:00. 12:25
17612. Rajyarani. 18:45. 07:20. 12:35
17057. Devgiri. 21:30. 08:50. 11:20
12071. Janstabdi 12:10. 19:45. J 07:35
20706. Vande B. 13:10. 20:30.J 07:20
Exten. Jlna Ned 20:30. 23:30. 03:00
Total BBY-NED. 13:10. 23:30. 10:20
वरील सर्व वेळापत्रक पाहिल्यास प्रवास वेळात फक्त तास दोन तासाची जुजबी बचत पाहता अन् ते ही संपूर्ण चेयर कार ने प्रवास व वाढीव दर पाहता ही वंदे भारत नांदेड साठी सोईची ठरण्याची शक्यता आज तरी नसल्यात जमा आहे. मुंबई -नांदेड ६१० किमी अंतर कापायला आज ही जर इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या सुपर फ़ास्ट ट्रेन्स डबल ट्रॅक वर ही जर तासी ५५-६० किमी वेगानेच धावत असतील व १०-१२ तास घेत असतील तर मात्र ह्यास आपल्या तोंडाला पुन्हा पान पुसणं असंच म्हणावे लागेल. तेंव्हा वेळापत्रकात बदल व प्रवास वेळात बचत हे करणं नितांत गरजेचं आहे.
ताशी १०० किमी च्या वर धावणाऱ्या वंदे भारतला ६१० किमी अंतर कापायला तब्बल ९-१० तास लागणं हे अकल्पनीय ही आहे. नक्कीच प्रायोगिक तत्त्वावर सुरवातीस कमी गतीने चालवण्या जाणाऱ्या ह्या ट्रेन्सची ही पुढे गती वाढवून वेळापत्रकात ही तसे बदल होईल ह्या अपेक्षेने आज तरी वाट पाहू या.
हर्षद शहा
९४२२१७१२४५