नांदेड जिल्हयात 14 घरफोडया करणाऱ्या आरोपीस पोलिसांचे ताब्यात
मागोल काही दिवसा पासुन नांदेड जिल्हात घरफोडया घडल्या मुळे मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलोस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना घरफोडया उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. त्यानुसार पोलोस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार केले होते. सदर पथकांना मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणगे व आरोपीचा शोध घेणे बाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
दिनांक 30/12/2023 रोजी स्था.गु.शा चे पथकातील अधिकारी यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळालो को, नांदेड जिल्हयात घरफोडो करणारा आरोपी हा धानोरा (ज) ता. कळमनूरी जिल्हा हिंगोली येथे येणार असल्याची खात्रोशोर माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्था.गु.शा चे पथकाने धानोरा (ज) ता. कळमनूरी जिल्हा हिंगोली येथे जावुन सापळा रचुन आरोपो नामे श्रीकांत सर्जेराव चव्हाण, वय 27 वर्षे रा. धानोरा ता कळमनुरी जि. हिंगोली यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने व त्याचे साथीदार यांनी खालील प्रमाणे गुन्हे केले आहेत.
1) उघडकीस आणलेले एकुण 08 घरफोडीचे गुन्हे :-
1) पोलीस ठाणे रामतिर्थ 195/2023 कलम 457,380 भादंवि, 2) रामतिर्थ 247/2023 कलम 457,380 भादंवि, 3) हदगांव गुरनं. 207/2023 कलम 457,380 भादंवि 4) पो.स्टे. मुखेड 212/2023 कलम 457,380 भादंवि 5) पो.स्टे. मुखेड गुरंन 180/2023 कलम 457,380 भादंवि, 6) पो.स्टे. देगलूर 480/2023 कलम 457,380 भादंवि 7) पो.स्टे. नायगांव गुरनं 48/2023 कलम 457,380 भादंवि 8) पो.स्टे. लोहा गुरनं
150/2023 कलम 457,380 भादंवि. वरील प्रमाणे 8 गुन्हे केल्याचे आरोपीने कबुल केले आहे नमुद आरोपीकडुन घरफोडीतील 94 ग्रॅम (9 तोळे 4 ग्रॅम) सोन्याचे दागिने व 430 ग्रॅम (43 तोळे) चांदीचे दागिने व एक होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल असा एकूण किंमती अंदाजे 7,03,850/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
2) आरोपीने यापुर्वी केलेल्या गुन्हयात पाहिजे गुन्हयांची यादी :-
हा नांदेड जिल्हयातील सहा घरफोडीच्या गुन्हयात फरार होता. तसेच सदर जिल्हयातील 03 गुन्हयात व लातुर जिल्हयातील 01 गुन्हयात अशा एकुण 10 गुन्हयात फरार होता. नमुद आरोपीस पो. स्टे. मुखेड येथे पुढील तपासकामी देण्यात आले आहे. नमुद आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस आरोपी हा हिंगोली
अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय, स्थागूशा नांदेड सपोनि / रवि वाहुळे, सपोनि पांडूरंग माने, पोउपनि सचिन सोनवणे, पोउपनि आशिष बोराटे, पोउपनि दत्तात्रय काळे, सपोउपनि / माधव केंद्रे, पोहेकों / गुंडेराव करले, पोना / संजिव जिंकलवाड, पोना/दिपक पवार, देवा चव्हाण, पोकों/ बालाजी यादरगीरवाड, पोकों/ज्वालासिंग बावरी, पोकों / गजानन बयनवाड व चापोकों/ हनुमानसिंह ठाकूर, चापोकों / कलमी शेख यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.