डॉ.उस्मान गणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारातीम नांदेडचा फुटबॉल संघ आंतर विद्यापीठीय स्पर्धेसाठी रवाना
नांदेड दि.30 मुंबई येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी प्रशिक्षक डॉ.उस्मान गणि यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चा संघ मुंबई कडे रवाना झाला. या संघात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील एकुण 20 खेळाडूंचा समावेश करण्यात आला,असून संघाचा कर्णधार म्हणून नविद कुरेशी मन्नान कुरेशी याची निवड करण्यात आली या संघात खेळाडू म्हणून मसलगे किशोर, लाहोटी आदित्य,पंजातिया सौरव,तुषार तेकचंदानी, सय्यद अदनान,उमेर खान, मोहम्मद ईरशाद,पटेल मोहम्मद कैफ,अकाश नागरगोजे,
ओंमकार बालासाहेब,जाधव सतीश, रोडे आदित्य. सोमवारे अर्जुन,सय्यद अदनान अली, शेख अफान,शेख अजांन,साबने आदित्य, राठोड प्रवीण,कांबळे विवेक, यांचा समावेश आहे. मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून डॉ.उस्मान गनी तर संघव्यवस्थापक डॉ.कदम गजानन हेही संघा सोबत रवाना झाले आहेत आहेत. या स्पर्धेत गोवा,गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी स्वारातिम विद्यापीठ क्रीडा विभागाचे कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय ठाकूर सर लुटे सर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.