स्पोर्ट्स

IND vs SA: KL Rahul ने धोनीचा विक्रम मोडला.. 14 वर्षे जुना विक्रम ज्याला कोणीही हात लावू शकले नाही.

 

पर्ल: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज KL Rahul ने Dhoni चा तो विक्रम शांतपणे गाठला आहे ज्याला गेल्या 14 वर्षांपासून कोणीही हात लावू शकले नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात KL Rahul 35 चेंडूत केवळ 21 धावा करून बाद झाला. गेल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते. त्यावेळी त्याने 2023 मध्येच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा ओलांडला होता.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना KL Rahul चा वर्षातील शेवटचा वनडे असेल. तसेच यावर्षी त्याने 24 एकदिवसीय डावात 1060 धावा केल्या आहेत.

यासह KL Rahul एका वर्षात 1000 वनडे धावा करणारा दुसरा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज बनला. याआधी केवळ Dhoni नेच हे स्थान मिळवले होते.

Dhoni ने 2008 मध्ये वनडेमध्ये 1098 धावा केल्या होत्या. यानंतर 2009 मध्ये त्याने 1198 धावा केल्या. त्याच्यानंतर, KL Rahul हा एकमेव यष्टीरक्षक फलंदाज आहे ज्याने एका वर्षात 1000 वनडे धावांचा टप्पा ओलांडला आहे.

KL Rahul ने 2023 विश्वचषक मालिकेतच 10 डावात 452 धावा केल्या होत्या. त्याने 2023 मध्ये 24 डावात 1060 धावा जोडल्या आहेत. त्याची सरासरी ६६.२५ आहे. KL Rahul या वर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू आहे.

2023 ODI मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी –

Shubhman gill – 1584 धावा – 29 डाव
Virat Kohli – 1377 धावा – 24 डाव
Rohit Sharma – 1255 धावा – 26 डाव
KL Rahul – 1060 धावा – 24 डाव
Shreyas aiyyer – 846 धावा – 19 डाव

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button