इंडिया आघाडीबद्दल तुम्हाला फार प्रेम, तुम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत जा, दानवेंचा जलील यांना सल्ला
छत्रपती संभाजीनगर: तुम्ही आम्हाला भारतीय जनता पक्षाची भीती म्हणत असाल तर आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इंडिया गाडीच्या सोबत यायला तयार आहेत, असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. यावरती बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, खासदार इम्तियाज जलील बोलतात त्याला त्यांच्या एमआयएम पक्षाच्या प्रमुखांचा पाठिंबा आहे का हे बघितलं पाहिजे. तेलंगात निवडणूक झाली, त्यावेळी ती भूमिका का मांडली नाही? कारण एमआयएम पक्ष सगळ्या ठिकाणी कुणाला तरी सपोर्ट होईल असेच वागतो. वैचारिक बैठक काय आहे. यांना एवढेच इंडिया आघाडी बद्दल प्रेम असेल त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जावं असते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी सगळ्याच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. एमआयएमने इंडिया आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त करतानाच आपल्यावर टीका करणाऱ्या नेत्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं. जर आम्हाला भाजपची बी टीम म्हणणार असाल तर आम्हाला इंडिया आघाडीत सामिल करून घ्या, असं जलील म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार इम्तियाज जलील बोलतात त्याला त्यांच्या एमआयएम पक्षाच्या प्रमुखांचा पाठिंबा आहे का हे बघितलं पाहिजे. तेलंगात निवडणूक झाली, त्यावेळी ती भूमिका का मांडली नाही? कारण एमआयएम पक्ष सगळ्या ठिकाणी कुणाला तरी सपोर्ट होईल असेच वागतो. त्यांची वैचारिक बैठक काय आहे. यांना एवढेच इंडिया आघाडीबद्दल प्रेम असेल त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जावं, असा सल्ला विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिला.
पुढे बोलताना अंबादास जाणे म्हणाले की,शिवसेना ही एमआयएमला मानतच नाही. एमआयएम पक्ष हा जातीवादी आहे. त्यांचा विचार काय आहे. राज्यघटनेवर त्यांचा विश्वास आहे का? की शरीयतवर त्यांचा विश्वास आहे? हे त्यांना विचारलं पाहिजे. त्यामुळे इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीबद्दल एवढंच प्रेम असेल तर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जा ना… एमआयएम भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढू शकत नाही. एमआयएम भारतीय जनता पक्षाची दुसरी टीम आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अनेक मुस्लिम नेते आहेत त्यामुळे इम्तियाज जलील यांनी देखील काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये यावं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे. त्या ठिकाणी एक्सिडेंटली निवडून आलेले आहेत, असं देखील आमदार अंबादास दानवे म्हणाले.