स्पोर्ट्स

जालंधर, कस्टम मुंबई, पटिआला, नाशिक संघांचा सहज विजय

डेक्कन हैदराबादचा 8 गोलांची सरबत्ती !
मंगळवारी उप उपांत्य फेरीचे सामने !

रविंद्रसिंघ मोदी
नांदेड दि. 26 : सोमवार रोजी अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एण्ड सिल्वर कप हॉकी स्पर्धेत साखळी सामन्याचा शेवटचा दिवस होता. उपउपांत्य फेरी गाठण्यासाठी आज हॉकी संघांनी आपले अनुभव आणि खेळ कौशल पणास लावले. आजच्या पहिल्या सामन्यात पंजाब पोलीस जालंधर संघाने 2 विरुद्ध 1 गोल फरकाने सैफई हॉस्टल इटावा संघाचा पराभव केला. दोन्ही संघांनी दर्जेदार हॉकी खेळाचे प्रदर्शन करून प्रेक्षकांची मनं जिंकली. पंजाब पोलीस संघातर्फे कर्णधार वरिंदरसिंघ आणि करणबीर सिंघ यांनी क्रमशः 43 व 57 व्या मिनिटास गोल केले. इटावा संघातर्फे कर्णधार मोहम्मद कैफ याने गोल केले.

आजच्या दुसऱ्या सामन्यात डेक्कन हैदराबाद संघाने 8 विरुद्ध 0 गोल अंतराने चार साहेबजादे हॉकी संघावर मात केली. बलाढ्य डेक्कन हैदराबाद मागील स्पर्धेचा उपविजेता संघ आहे. आजच्या सामन्यात बोडिगम रामकृष्ण आणि ठाकुर अभिनन्दन यांनी प्रत्येकी दोन गोल केले. तसेच भवानी रणजीत चंद, शेख अब्दुल मोइज, मोहम्मद अब्दुल आलिम, फरहाज फिरोज बिन यांनी प्रत्येकी एक गोल केला. चार साहेबजादे संघाच्या खेळाडूंना गोल करता आले नाही.
तीसरा सामना कस्टम मुंबई आणि खालसा यूथ क्लब संघात खेळला गेला. संघर्षपूर्ण अशा सामन्यात मुंबई संघाने 2 विरुद्ध 1 गोलाने विजय संपादित केला.खेळाच्या 33 व्या मिनिटाला नांदेड संघाच्या राजेंद्र नागनूर याने गोल करून आघाडी घेतली. पण दोन मिनिटाच्या अंतरानेच मुंबई संघाने मिळालेल्या एका पेनल्टी कार्नरचे कर्णधार जाधव जयेश याने गोलात रूपांतरित करून बरोबरी साधली. दोन्ही संघांनी वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. पण शेवटी 58 व्या मिनिटाला मुंबई केंची वेंकेटेश याने मैदानी गोल करून विजय खेचून घेतला.

चौथ्या सामन्यात पीएसपीएल पटिआला संघाने भुसावल रेलवे बॉयज संघाचा 2 विरुद्ध 0 गोल अंतराने पराभव केला. दोन्ही संघांनी एकमेकावर गोल करण्यासाठी प्रयत्न केले. पटिआला संघाने 42 व्या आणि 57 व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय निश्चित केला. आजचा पाचवा आणि शेवटचा साखळी सामना आर्टलेरी सेंटर नाशिक आणि वेस्टर्न रेलवे मुंबई संघादरम्यान खेळला गेला. नाशिक संघाने रेलवे मुंबई संघाचा 3 विरुद्ध 0 गोलाने पराभव केला. नाशिक संघाने 15 व्या, 20 व्या आणि 60 व्या मिनिटाला गोल केले. गुरप्रीतसिंघ, मनप्रीतसिंघ आणि कर्णधार मनप्रीतसिंघ याने प्रत्येकी एक एक गोल केले. उद्या पासून उप उपांत्य फेरीचे (कवार्टर फाइनल) सामने खेळले जाणार आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button