वैदयकिय व विक्री प्रतिनिधींचा दिनांक २० डिसेंबर, २०२३ ला अखिल भारतिय संप
फेडरेशन ऑफ मेडिकल अॅन्ड रिप्रेझेन्टेटीव्हज् असोसिएशन्स ऑफ इंडिया (FMRAI) च्या अहवानानुसार देशभरातील २,००,००० चे वर औषध क्षेत्रात काम करणारे विक्री संवर्धन कर्मचारी म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज) हे दिनांक २० डिसेंबर २०२३ ला वैदयकीय व विक्री प्रतिनिधींच्या आठ सुत्री मागण्यांना घेवून एक दिवसीय संप करीत आहेत.
ज्या “विक्री संवर्धन कर्मचारी कायदा १९७६ (SPE ACT 1976)” मुळे वैद्यकीय प्रतिनिधींच्या नोकरीला कायदेशिर संरक्षण मिळून त्यांच्या नोकरीत स्थैर्यता आली व त्यांचे भौतिक जीवन उन्नत झाले. तो “SPE ACT 1976” कायदा केंद्रातील नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील सरकारने सप्टेंबर २०२० च्या संसदेच्या अधिवेशनात नविन श्रम संहिता पारित करतांना मोडित काढला आहे. त्यामुळे मालक वर्गाला कामगार कर्मचा-यांचे शोषण करायसाठीचा मुक्त परवाना मिळाला असून त्यांच्या गुलामगिरीत वाढ होणार आहे. तसेच वैद्यकीय प्रतिनिधींच्या कामाचे नियमन कादया अतर्गत् ठरवलेले नसल्यामुळे त्यांचे प्रचंड शोषण कंपन्या स्वतःचे खाजगी कामाचे नियम बनवून करीत आहे तसेच सरकारी आरोग्य व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना औषधी प्रमोशन साठी केंद्र सरकारने बंदी घालून घटनेने दिलेल्या रोजगाराच्या अधिकारावर गदा आणली आहे
त्याच बरोबर केंद्र सरकार कडे औषधांच्या विवैमतीचे नियमन करायची यंत्रणा असून सुध्दा सरकार औषध कंपन्यांच्या दबावाखाली त्याची प्रभावी अंमलबजावणी करीत नाही, तरी औषध व औषधी उपकरणे जसे मेडिकल इम्प्लांट (हृदयरोग साठी) व इतर उपकरणे यावरील GST (जि. एसटी) रद्द करुन सर्वसामान्य जनतेला सध्याच्या महगाईत दिलासा दयावा. ह्या संपामध्ये आमच्या पुढील मागण्या आहेत
अ) केंद्र सरकारकडे मागण्या
१) चार कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा व विक्री संवर्धन कर्मचारी कायदा १९७६ चे पुर्नेजिवन करा २) विक्री संवर्धन कर्मचाNयांसाठी कामकाजाचे “संवैधानिक” नियम तयार करा. ३) सरकारी इस्पितळे व आरोग्य व्यवस्थपनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींच्या प्रवेशावरील सर्व निबंध रद्द करा व त्यांच्या रोजगाराचा घटनात्मक अधिकार सुनिश्चित करा. ४) औषध व औषधी उपकरणावरील GST रद्द करा व औषधाच्या किंमती कमी करा ५) डाटा गोपनियतेचे संरक्षण करा.
ब) औषध उदयोगाकडे मागण्य
१) औषध विक्री उद्दीष्ठ गाठण्याच्या नावाखाली वैद्यकीय प्रतिनिधींची छळवणुक व शोषण बंद करा. २) GPS द्वारे ट्रॅकिंग आणि पाळत ठेवून वैद्यकीय प्रतिनिर्धीच्या गोपनियतेमध्ये घुसखोरी करु नका. ३) वैद्यकीय प्रतिनिधींचा कामाच्या ठिकाणी विना अडथळा प्रवेश सुनिश्चित करा.
ह्या मागण्यांकरीता देशभरातील वैदयकीय व विक्री प्रतिनिधी दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी देशव्यापी एक दिवसाचा संप करणार आहेत. ह्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन / मोर्चा काढून मा. पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी / तहसिलदार यांच्या मार्पर्वत निवेदन देणार आहोत.