महाराष्ट्र धनुर्विद्या वरिष्ठ गटाच्या प्रशिक्षक पदी वृषाली पाटील जोगदंड तर संघात नांदेड ची सृष्टी जोगदंड व ज्ञानेश चेरली ची निवड
भारतीय धनुर विद्या संघटनेच्या वतीने आयोध्या उत्तर प्रदेश येथे आयोजित 43 व्या राष्ट्रीय धनवृत्त स्पर्धेसाठी पहिल्यांदाच महाराष्ट्र वरिष्ठ गटाच्या प्रशिक्षक पदी नांदेडच्या सचिव तथा राष्ट्रीय प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र संघात रिकव्हर प्रकारात महिलांमध्ये सृष्टी बालाजी जोगदंड व पुरुष संघात ज्ञानोबा ज्ञानेश बालाजी चेरले यांची निवड झाली आहे . भारतीय धनुर्विद्या संघाच्या अंतर्गत उत्तर प्रदेश धनुर्विद्या संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे दिनांक 24 ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान वरिष्ठ गटाच्या 43 व्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक पदी नांदेडच्या वृषाली पाटील जोगदंड यांची निवड महाराष्ट्र धनुर्वीघा संघटनेचे महासचिव प्रमोद चांदरकर यांनी केली आहे.
सदरील संघात नांदेडच्या सृष्टी जोगदंड व ज्ञानेश चेरलेसह प्रतीक, साळुंखे, यशदीप भोगे, सुखमणी बाबरेकर मंजिरी आलोने, गार्गी चव्हाण, शर्वरी शेंडे यांची तर व्यवस्थापक म्हणून स्वप्निल भोयर पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रवीण सावंत यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्राचा संघ नुकतेच अयोध्येला रवाना झाला . त्याच्या या निवडीबदल त्याचे क्रीडा संघटक डॉ. हंसराज वैद्य, कोषाध्यक्ष सुरेश तमलुरकर, नांदेडचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास भुसेवार, उपाध्यक्ष मुन्ना कदम कोंडेकर, क्रीडाधिकारी बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, संजय बेतीवार, सहसचिव संजय चव्हाण, नारायन गिरगावकर, बाबुराव खंदारे, शिवानंद लिंगायत, सोनल बुंदेले, गजानन फुलारी, विनोद गोस्वामी, शिवाजी% पुजरवाड, मालोजी कांबळे, राजेंद्र सुगावकर, प्रविण गडदे, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .