क्राईम

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करुन देशी मद्य निर्मिती कारखाना आणला उघडकीस

 

 नांदेड,  दि.16 :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांच्या निर्देशान्वये व संचालक (अंवद) सुनील चव्हाण तसेच विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क श्रीमती उषा राजेंद्र वर्मा यांचे मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांना मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार छापा टाकून बनावट देशी मद्य निर्मिती कारखाना उघडकीस आणला.

 

नांदेड विभागाच्या या पथकाने औसा धाराशिव या रोडवर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मौ. शिवली येथे चार चाकी वाहनाने बनावट देशी मद्य वाहतूकीची खात्रीलायक बातमी मिळाली. त्यानुसार 8 नोव्हेंबर रोजी निरीक्षक एस.एस.खंडेराय पथकाने सापळा रचुन एक महिद्रा कंपनी निर्मित बोलेरो पिकअॅप चार चाकी वाहन क्र. एमएच 25-पी-2405 व 10 बॉक्स बनावट देशी मद्य (टॅगो पंच) व दोन ॲन्ड्रॉईड मोबाईल जप्त केले. आरोपी बाळासाहेब घेडीबा जाधव रा.जातेगाव ता.गेवराई, जि.बीड, सोहेल मुख्तार पठाण रा.फकिरा नगर वैरागनाका धाराशीव यांना अटक केली.

 

तपासात आरोपीस विचारणा केली असता धाराशिव जिल्ह्यातील मौ.पिपरी येथील जुना कत्तल खाना धाराशिव येथे जाऊन प्रो. गुन्ह्याकामी छापा मारला असता तेथे बनावट मद्य बाटलीत भरण्यासाठी वापरण्यात आलेली मशीन, बनावट मद्य भरलेल्या बाटल्या व बुच (कॅप) बनावट लेबले सिलबंद करण्यासाठी वापरण्यात आलेली मशीन, 180 मी. लि. क्षमतेच्या 4 हजार 600 रिकाम्या बाटल्या, बनावट देशी मद्याचे रिकामे कागदी खोके (कार्टून्स), तिन अँन्ड्रॉईड मोबाईल व इतर साहित्याचा मुद्देमाल मिळून आला.

 

राहुल कुमार मेहता रा.अल्लीनगर जि.पूर्णिया बिहार, ह.मु.धाराशिव, बाबुचन राजेंद्र कुमार रा.रोसका कोसका जि.पूर्णिया बिहार ह.मु.धाराशिव,गौतम कपिलदेव कुमार रा. काजा जि.पूर्णिया बिहार ह.मु. धाराशिव, सोनु कुमार रा. बनियापटी जि.पुर्णिया बिहार ह.मु.धाराशिव, सुभाष कुमार रा.बनियापटी जि.पुर्णिया बिहार ह.मु.धाराशिव यांना अटक करण्यात आली आहे. बनावट देशी मद्य (टॅगो पंच) व मद्य निर्मिती करण्यासाठी लागणारे साहित्य पुरविणारा आरोपी नामे रोहित राजु चव्हाण रा. नाथनगर जि.बीड यास अटक केली. शशी गायकवाड रा. आंबेओहळ हा आरोपी फरार आहे.

 

या दोन्ही ठिकाणहून एक चार चाकी वाहन व बनावट देशी मद्य (टॅगो पंच) व मद्य निर्मिती करण्यासाठी लागणारे साहित्य, मशीन व इतर असा एकुण 12 लाख 90 हजार 400 रुपये इतका किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध चालु आहे.

 

दुय्यम-निरीक्षक के.जी.पुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निरीक्षक एस.एस.खंडेराय विभागीय भरारी पथक नांदेड यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५,८०,८१,८३,९०,१०८ तसेच भा.द.वि. कलम ३२८ अन्वये गुन्हा नोदविला आहे. या गुन्हयातील आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्याना तीन दिवसाची एक्साईज कोठडी मंजुर झाली आहे. या कारवाईत निरीक्षक एस.एम.पठाण, दुय्यम-निरीक्षक एस.डी.राजगुरु, ए. एन.पिकले, स्वनील स.दु.नि बालाजी पवार, जवान पि.एस.नांदुसेकर, जी. डी. रनके. निवास दासरवार, दिलीप नारखेडे, रावसाहेब बोदमवाड यांचा सहभाग आहे. पुढील तपास निरीक्षक एस.एस.खंडेराय हे करीत आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल क्र.१८००८३३३३३३ व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००११३३ तसेच दुरध्वनी क्र. ०२४६२२८७६१६ वर संपर्क करावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button