शिक्षण

विद्यार्थ्यांमधून आदर्श शिक्षक निवडणे ही संकल्पना कौतुकास्पद

नांदेड – शिक्षक हा सुसंस्कारीत समाज निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारा घटक आहे. विद्यार्थ्यांना घडवित असतांना शिक्षकाचे मूल्यमापन विद्यार्थ्यांकडूनसुध्दा होत असते. ही बाब लक्षात घेवून महात्मा फुले हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यांमधून आदर्श शिक्षकांची निवड केली. ही संकल्पना कौतूकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री डी.पी.सावंत यांनी केले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमधून निवडलेल्या आदर्श शिक्षक गौरव सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीचे सहसचिव ॲड.उदयरावजी निंबाळकर, कोषाध्यक्ष डॉ.रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य पांडूरंग पावडे, मुख्याध्यापिका सौ.एस.आर.कदम, उपमुख्याध्यापक डी.एस.काळे, पर्यवेक्षक एस.एन.सूर्यवंशी, सौ.व्ही.आर.देशमुख, सौ.एस.आर.थडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले हायस्कूल ही जिल्ह्यातील एक नामवंत शाळा आहे. या शाळेत गुणवत्तेला पूर्वीपासूनच महत्व दिल्या जाते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीने निवडलेला आदर्श शिक्षक पुरस्कार हा इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा मानाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा फुले हायस्कूल बाबानगर व विजयनगर येथील आर.एस.खांडरे, ए.डी.रायकवाड, व्ही.एम.शिंदे, आर.जी.जाधव, ए.आर.गंड्रतवार, सौ.एस.डी.कोलेवाड, सौ.जे.एन.नागरगोजे, डॉ.सौ.पी.ए.नेवरकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व वृक्ष भेट देवून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी बाबानगर व विजयनगर विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वृक्षाची रोपटे देवून गौरविण्यात आले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button