शहर
सकल मराठा बांधवांचे मोर्चाचे अनुषंगाने शहरात एक मार्गी वाहतुकीचे नियोजन
सकल मराठा समाजाचे वतिने अंतरवली सराटी ता. अंबड जि. जालना येथील मराठा समाजाचे आरक्षण सबंधाने उपोषनास पाठीबा व जालना जिल्हयातील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 04.09.2023 रोजी नांदेड जिल्हा बंद बाबत जिल्हयातील तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर निवेदन प्राप्त झाले आहेत.
त्या अनुषंगाने नांदेड शहरात सकल मराठा समाज यांचे तर्फे बद चे आयोजन करून मार्चा काढण्यात येणार असुन सदर चा मोर्चा राजकार्नर येथुन सुरवात होवून वर्कशॉप, श्रीनगर, आय.टी.आय., शिवाजीनगर, कलामंदीर, वजिराबाद चाक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा असुन सदरचा मोर्चा सकाळी 11.00 वा. सुरवात होणार आहे. शहरातील रहदारीची वेळ असल्याने शहरात एक मार्गी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असुन पोलीसांनी दिलेल्या निर्देशानुसार वाहतुकीचे नियमाचे पालन करावे. संपुर्ण जिल्हयामध्ये योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला असुन कोणीही कायदा हातात घेवून शांतता भंग करू नये व शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यांची दक्षता घ्यावी. नागरीकांना काही अडचन असल्यास त्यांनी डायल 112 या नंबरवर संपर्क करून तात्काळ मदत उपलब्ध करून घ्यावी असे आव्हान पोलीस अधिक्षक मा. श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक मा. अविनाश कुमार, नांदेड यांनी केले आहे.