क्राईम

ट्रकचालकाचे खुनाच्या गुन्हयातील फरार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

पोलीस ठाणे नदिड ग्रामीण हसीमध्ये मारताळा शिवारातील पेट्रोलपंपासमोर बाहेर राज्यातील ट्रक चालकाकडील रोख रक्कम जबरीने चोरी करून त्याचा अज्ञात आरोपीतांनी खंजरने खुन केला होता. त्यावरुन पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 362 / 2022 कलम 302,394,34 भा.द.वि सहकलम 4/25, 4/27 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील एक आरोपी अटक करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील इतर आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नदिड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक 30/08/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारा आरोपी हा लातुर फाटा, नांदेड येथे असल्याबाबत माहीती मिळालेने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे सचिन ऊर्फ वोवडया पिता बापुराव भोसले वय 25 वर्ष रा. कुरुळा ता कंधार जि नांदेड ह. मु. ताडपांगरी ता. जि. परभणी यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. नमुद आरोपीस पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हयाचे तपासकामी देण्यात आले आहे..
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि / रवि वाहुळे, पोउपनि /सचिन सोनवणे, पोह/ गुंडेराव करले, गंगाधर कदम, बालाजी तेलंग, रुपेश दासरवार, पोना / देवा चव्हाण, संजिव जिंकलवाड, पोकॉ/ धम्मा जाधव, ज्वालासिंघ बावरी, चालक पोकों/मारोती मुंडे स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button