क्राईम
पोलीस ठाणे वजीराबाद आणि केमीस्ट अँन्ड ड्रगीस्ट असोशिएशनची बैठक संपन्न
नांदेड जिल्हयात व शहरामध्ये गुन्हेगारांकडुन विविध प्रकारचे नशेचा वापर करण्यात येत असुन नशेमध्ये सदरचे गुन्हेगार गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत असल्याचे समोर आले. आहे. त्या अनुषंगाने मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड व मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी सदर अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सदर सुचनांचे अनुषंगाने आज दिनांक 30.08.2023 रोजी मा. श्री. सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग नांदेड शहर यांचे अध्यक्षतेखाली शहरातील केमीस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोशिएशनचे पदाधीकारी यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीस पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड येथील अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, रमेश खाडे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार माधव मरेकंटलु ससेच केमीस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोशिएशनचे श्री. शंतनु कोडगिरे, अध्यक्ष डॉ. राहुल लव्हेकर सचिव, संजय मोटे सचिव, सदस्य लक्ष्मीकांत लोकमनवार, रामदेव दाढ, श्रीकांत गुंजकर, आ. वारी. सय्यद ईकबाल, गिरीष देशमुख तसेच ईतर पदाधिकारी व मेडीकल दुकानदार उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये गेडीकल दुकानदासोबत गुगीकारक औषधी पासुन होणाऱ्या परीणामाबाबतची चर्चा करून मेडीकल दुकानदारांनी 01. डॉक्टरांचे सल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे मेडीसीन विक्री करू नये, 02. गुंगीकारक औषधी द्रव्य ज्यामध्ये अल्फ्राझोलम, नायट्रोसन, लुमोटीन, कोरॅक्स/कोडीन, ट्रॅमाडौल व ईतर गुंगीकारक इंजेक्शन हे कोणत्याही परिस्थीतीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री करु नयेत, 03. प्रत्येक मेडीकल धारकांनी आपले मेडीकल स्टोअरर्स मध्ये सिसिटीव्ही कॅमेरे बसवावेत, ज्यापैकी एक कॅमेरा हा प्रमुख रोडच्या दिशेचे संपूर्ण व्हीडीओ चित्रीकरण करणारा असावा 04 ज्या मेडीकल धारकांना 24 तास मेडीकल चालविण्याचा परवाना नाही त्यांनी त्यांना नेमुन दिलेल्या वेळेमध्येच आपले मेडीकल बंद करावेत. 04. ज्या मेडीकल धारकांना 24 तास मेडीकल चालविण्याचा परवाना आहे. त्यांनी रात्रीचे वेळी एकच खिडकी चालु ठेवावी 05. गुगीकारक औषधीची मागणी करण्यासाठी कोणी आल्यास तात्काळ फोन करण्यासाठी पोलीस अधिकारी यांचे फोन नंबर उपलब्ध करुन देण्यात आले तसेच डायल 112 या क्रमांकावर तात्काळ माहीती देण्याबाबत सुधीत करण्यात आले आहे.
सदर बैठकी दरम्याण पोलीसांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत य पोलीसांना मदत करणेबाबत केमीस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोशिएशनचे पदाधीकारी यांनी आश्वासन दिले आहे.