क्राईम
दोन विधीसंघर्षीत बालकाना मोटर सायकली चोरताना वजीराबाद पोलीसांकडुन अटक
नांदेड शहरामध्ये मोटरसायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग, नांदेड शहर, यांनी अभिलेखावरील मोटरसायकल चोरी करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचेकडे बारकाईने तपास करुन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सुचना गुन्हे बैठकीमध्ये दिल्या होत्या.
सदर सुचनांचे अनुषंगाने श्री. अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे श्री. शिवराज जमदडे, सहा. पोलीस निरीक्षक, पोहेकॉ/2083 दत्तराम जाधव, पोना / 2085 विजयकुमार नंदे, पोना / 1353 शरदचंद्र चावरे, पोना / 152 मनोज परदेशी, पोकों/3088 बालाजी कदम, पोकों/ 148 गंगुलवार, पोकॉ/ 3136 रमेश सुर्यवंशी पोकों / 2896 इम्रान शेख, पोकों/ 14 भाऊसाहेब राठोड यांनी शहरातील मोटरसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण ज्याठीकाणी जास्त आहे अशा ठीकाणचे सिसिटीव्ही पाहणी करून तेथील डॅम्पडाटा हस्तगत केले व परीसरामध्ये सापळे (Trap) रचुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचे निश्चीत केले. त्याप्रमाणे व्हॉटसपग्रुप ग्रुप तयार करुन व विविध ठीकाणी सापळे रचुन चोरटयंचा शोध घेणे चालु होते.
काल दिनांक 28.08.2023 रोजी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नगिनाघाट या ठिकानी सापळा रचुन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक अभिलेखावरील चोरी करणारा विधीसंघषीत बालक व त्यासोबत एक बालकाकडे पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड याठीकाणी दाखल असलेल्या चोरीच्या गुन्हयातील मोटरसायकल आढळुन आल्याने त्याचेकडे मोटरसायकल बाबत विचारणा करता ती चोरीची असल्याची सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारणा करता त्यांनी रणजितसिंघ मार्केट जुना मोढा नांदेड येथील पार्कीगमध्ये चोरीच्या ईतर तीन मोटरसायकली असल्याची माहीती दिली. त्यावरुन त्याचेकडुन सदरच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदर विधीसंघर्षीत बालकाकडुन घोरीच्या एकुण चार मोटरसायकली किंमती 1,10,000/- रुपयाच्या हस्तगत करण्यात आल्या असून, त्यामध्ये एक बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटर सायकल, एक हिरोहोंडा स्प्लेंडर कंपनीची मोटर सायकल, एक बजाज कंपनीची CT100 B मॉडेलची मोटर सायकल, एक TVS कंपनीची PEPT मॉडेलची स्कुटी आहे. सदर चोरीच्या मोटरसायकली बाबत माहीती घेता. पो.स्टे. वजीराबाद येथे गु.र.न.310/2023, 337/2023 कलम 379 भारतीय दंड विधान, असे दोन गुन्हे उघडकीस आलेले असुन सदर गुन्हयाचा तपास ASI धोंडीराम केंद्रे व पोहेकॉ संभाजी लोकडे हे करीत आहेत.
नादेड जिल्हा पोलीस दलातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, गर्दीच्या ठीकाणी आपली मोटरसायकल पार्किंग करीत असतांना शक्यतो उच्च प्रतीव्या लॉकचा वापर करावा. तसेच कोणाकडे बिना कागदपत्रांच्या मोटरसायकली आहेत अशा नागरीकांनी त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनला माहीती देऊन मोटरसायकली जमा कराव्यात. जेणेकरुन आपणाविरुध्द कोणत्याही प्रकारची कायदेशिर कार्यवाही होणार नाही याची दक्षता घ्यावी.
नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोटरसायकल चोरटास पकडुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्यबद्दल वरीष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.