मक्का मस्जिद ते हनुमान मंदिर इतवारा पर्यंत सी.सी. रस्ता करण्याची मागणी
नांदेड दि .23 जुन्या नांदेड परिसरातील मक्का मस्जिद ते हनुमान मंदिर या रस्त्याची अवस्था मागील अनेक वर्षापासून अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे या परिसरात राहण्याच्या नागरिकांचा जीव मेटाकुटीला येत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील रस्त्याचे काम केले जात नाही. सध्या श्रावण मास आहे आणि त्यानंतर अनेक सण उत्सव यांची रेलचल राहणार आहे. त्यापूर्वीच या परिसरातील हा रस्ता केला तर नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होईल. यासाठी मस्जिद समिती मार्फत सीसी रस्ता करण्याची मागणी करण्यात आली आहे.मागील 25 वर्षापासुन जुनी ड्रेनेज लाईन अता नविन करुन देण्यात आली. त्यामुळे मक्का मस्जिद ते हनुमान मंदिर पर्यंत रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट व खराब झाली आहे.ह्या रस्तावर दोन पवित्र धार्मीक स्थळे मक्का मस्जिद व हनुमान मंदिर आहे.
त्याचबरोबर भाजीपाला बाजार देखील याच रस्त्यावर आहे त्या मुळे या रस्त्यावर दररोज सेकडो लोकांची ये-जा असते.हा रस्ता खराब झाल्यामुळे लोकांना खुप त्रास होत आहे या रस्त्याचे मजबुतीकरण मागील 20 वर्षा पुर्वी झाले होते. तेव्हापासून या रस्त्याकडे पूर्णतः महानगरपालिका राजकीय पुढार्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. नविन रस्ता होने अत्यंत गरजेचे आहे. करिता मेहरबान साहेबांनी तत्काळ मक्का मस्जिद ते हनुमान मंदिर रस्ता मजबुतीकरण करून लोकांना होणाऱ्या दररोजच्या त्रासापासून सुटका करावी अशी मागणी मज्जित व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सय्यद गुलाब अहमद यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. सदरील मागणीची प्रतिलिपी नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांना देखील देण्यात आली आहे. लवकरात लवकर रस्ता करून नागरिकांची सोय करावी अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.