मराठवाडा
प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी परभणीत रेल्वे परिषद घेणार -खा डॉ फौजिया खान
जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद बारी
मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच रेल्वे अधिकारी आणि रेल्वे राज्यमंत्र्यांना निमंत्रित करून परभणीत रेल्वे परिषद घेण्याचा मानस राज्यसभा सदस्य खा. फौजिया खान यांनी मराठवाडा रेल्वे महासंघाच्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला. या बाबत माहिती अशी की आज परभणीत मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यासोबत खा. फौजिया खान यांनी बैठक घेऊन मराठवाड्यातील विविध प्रलंबित प्रश्न जाणून घेतले यावेळी चर्चेदरम्यान दक्षिण मध्य रेल्वे दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागात अजूनही किमान तिकिटाच्या नावाखाली 30 रुपये घेण्यात येतात खरे तर दक्षिण मध्ये रेल्वेचे अन्य विभागात किमान तिकीट दहा रुपये असताना मराठवाड्यात मात्र हा भेदभाव केला जात असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी खासदारांच्या लक्षात आणून दिले यावेळी कोविड पूर्व चालणाऱ्या अनेक गाड्या अजूनही विभागातून सुरू करण्यात आल्या नाहीत तसेच मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वेच्या सामान्य शयनयान म्हणजे जनरल स्लीपर कमी करून एसीचे कोचेस वाढवण्यात येत आहेत ही बाबही पदाधिकाऱ्यांनी खासदार साहेबांच्या लक्षात आणून दिली.
परभणी रेल्वे स्थानकावर चार व पाच क्रमांकाचे प्लॅटफॉर्म निर्माण करणे ,पीट लाईन निर्माण करणे, विभागातून गोवा, कन्याकुमारी ,वैष्णोदेवी कडे जाणाऱ्या गाड्या सुरू कराव्यात ,तसेच पुणे मुंबई साठी आणखीन एक गाडी उपलब्ध करून द्यावी, आदि तसेच रेल्वेच्या सुरक्षा सुरक्षा बाबत आणि चर्चेला मुद्दे घेण्यात आले मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वेचा प्रमाणित रेल्वेच्या प्रश्न पाहून खासदार फौजिया खान यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि रेल्वे राज्यमंत्री मा. दानवे साहेब यांना निमंत्रित करून परभणीत लवकरच रेल्वे परिषद घेण्याचा मानस असल्याचे यावेळी बोलून दाखवले तसेच आठ दिवसात दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापकासोबत मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक लावण्याचे यावेळी जाहीर केले. या बैठकीला मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, डॉ. राजगोपाल कलानी, बाळासाहेब देशमुख, श्रीमती सोनाली देशमुख , रुस्तुम कदम ,कदिर लाला हाशमी, माणिक शिंदे बलसेकर आदि उपस्थित होते