शहर

वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे तसेच प्रदूषण दूर करून पर्यावरणाचे जतन करणे ही काळाची गरज

नांदेड, 1- वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे तसेच प्रदूषण दूर करून पर्यावरणाचे जतन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड-वाघाळा महापालिकेचे उपायुक्त निलेश सुंकेवार यांनी केले.
नांदेड येथील परिसर अभियांत्रिकी गृहनिर्माण सोसायटी विकास नगर तरोडा बु येथे आज शनिवार दिनांक 1 जुलै रोजघ कृषी दिन व डॉक्टर डे तसेच सोसायटचेचेअरमन व नवोदया क्रिटिकल केअर नांदेडचे डॉ. श्याम दवणे यांच्या कन्या समीक्षा हीच्या वाढिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, पोलीस निरीक्षक बोलमवाड,
पोलीस निरीक्षक अशोक उजगिरे, महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त रावण सोनसळे, उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरतुल्ला बेग, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, लोकमत सखी मंचच्या सपना भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती वाठोरे, हृदयरोग तज्ञ डॉ. पटेल, बालरोग तज्ञ डॉ. राजेश नुणे, किडनी रोग तज्ञ डॉ. राजीव राठोड, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. वीरेंद्र अवधिया, आधारचे डॉ. तानाजी पातरपळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येपुरवार, डॉ. देवकते, डॉ. जायभाये, डॉ. शाम दवणे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

 

त्यानंतर उपस्थितांचा गुलाबाची रोपटे देवून सत्कार करण्यात आला. समीक्षा दवणेच्या उपस्थीतांच्या हस्ते पुष्पहार घालून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन परमेश्वर दिपके यांनी तर उपस्थितांचे आभार गंगाधर सोनाळे यांनी मानले. यावेळी पांडुरंग तारू, मनोहर भास्करे, सोपान गायकवाड, मीनाक्षी कावळे, शामराव हटकर, अशोक कावळे यांच्यासह विकास नगर सोसायटीचे सदस्य व परिसरातील नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button