जिला

जिल्ह्यातील ६१ पत्रकारांना १० लाखाच्या अपघाती विम्याचे सुरक्षा कवच प्रदान

 

 

नांदेड ( प्रतिनिधी ):- पत्रकारांना दिवसभर बातम्यांसाठी धावपळ करावी लागते.वाढत्या स्पर्धेमुळे होणाऱ्या धावपळीत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकार सभासदांचा अपघाती विमा काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याची सुरुवात आज शुक्रवारी ( ३० जून ) करण्यात आली आहे. पोस्टाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६१ पत्रकारांना दहा लाख रुपये अपघाती विम्याचे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे.

 

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पहिल्याच कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सर्व पत्रकार सभासदांचा अपघाती विमा काढण्याची संकल्पना अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी मांडली होती. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ३० जून रोजी सकाळी १० वाजता शिवाजीनगर भागातील नाना नानी पार्क येथे पहिल्याच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या विमा कवचद्वारे जिल्हा संघाने पत्रकार बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.

दहा लाखांचा हा अपघाती विमा असणार असून कोणी जखमी झाल्यास या विम्याच्या माध्यमातून त्याला उपचाराचा खर्चही मिळणार आहे. आजच्या शिबिरात उपस्थित ६१ पत्रकार सभासदांचा विमा काढण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी,कार्याध्यक्ष संतोष पांडागळे आणि सचिव राम तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर उपाध्यक्ष प्रल्हाद लोहेकर, सहसचिव सुरेश काशिदे व किरण कुलकर्णी, प्रशांत गवळे, प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे, कृष्णा उमरीकर, रवी संगनवार, नरेश दंडवते, महेंद्र देशमुख, अमृत देशमुख, राजकुमार कोटलवार, दिपंकर बावस्कर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी पोस्टाचे डाक अधीक्षक आर. व्ही. पाळेकर, डाक निरीक्षक वाय. एच. काटोले, कार्यकारी अधिकारी आर. आर. नागठाणे, आर. बी. भालेराव, डाक पाल के. बी. टेकाळे, जी. एन. स्वामी, पी. एम. सोळंके, आवेश पठान आदि पोस्टाचे अधिकारी,आयुष्यमान भारत योजनेचे समन्वयक तसेच बजाज अलियांज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या शिबिरात विमा कवच प्रदान करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून योग्य ते मार्गदर्शन देखील केले. दरम्यान जिल्हा पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button