मराठवाडा

नियंत्रण सुटलं, कार रस्त्याच्या खाली उलटली, तिघे गाडीबाहेर फेकले गेले अन् पीएसआयचा दुर्दैवी अंत

हिंगोली: कळमनुरीहुन बाळापूरकडे जात असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील एका पोलिस उपनिरीक्षकावर काळाने घात केला. कारवरील नियंत्रण सुटून ती उलटून झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जण जखमी झाल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हिंगोली – नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव फाटाजवळ हा अपघात घडला. निळकंठ लक्ष्मण दंडगे (वय ५०) असं या मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

मृत निळकंठ दंडगे हे मागील दोन वर्षांपासून खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक झाले होते. सध्या ते नागपूर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. शनिवारी रात्री ते शिवाजी गायकवाड आणि गजानन राठोड आपल्या या मित्रासोबत कारने प्रवास करत होते. कळमनुरीहुन बाळापूरकडे जात असताना माळेगाव फाटाजवळ येताच कार चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली उलटली.

या भीषण अपघातात पोलिस उपनिरीक्षक निळकंठ दंडगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिवाजी गायकवाड आणि गजानन राठोड हे दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मृत निळकंठ दंडगे हे औंढा तालुक्यातील जमगव्हाण येथील रहिवासी आहेत. या घटनेने दंडगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले आहेत. रविवारी राहत्या गावी निळकंठ दंडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माळेगाव फाटा बनला अपघाताच केंद्र

जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा हा अपघाताचे केंद्र बनत चालले आहे. या पूर्वी आयचर ट्रकने रोडच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याने चार मजुरांचा मृत्यू झाला होता. या व्यतिरिक्त या फाट्यावर अनेक छोटे मोठे अपघात घडले आहे. दरम्यान, शनिवारी अपघात होऊन एका पोलिस उपनिरीक्षकाचा मूत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button